मूल (प्रतिनिधी) : लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठीचा हे ब्रिद वाक्य घेवुन काम करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडीयाच्या राष्ट्रीय कार्यालयीन महासचिव दिव्याताई भोसले हया भंडारा येथील कार्यक्रम आटोपून मूल येथे मुक्कामी आले असता, त्यांनी दे धक्का एक्सप्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट देवुन पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा दिला. Divyatai Bhosle, General Secretary, National Office of Voice of Media, made a goodwill visit to De Dhakka Express office

व्हॉईस ऑफ मीडीया ही पत्रकारांसाठी देशपातळीवर काम करणारी संघटना असुन पत्रकारांसाठी कृतिशील मार्गाने सदर संघटना काम करीत आहे, नुकत्याच पार पडलेल्या विदर्भ अधिवेशनानंतर भंडारा येथे आयोजीत केलेल्या कौटुंबिक स्नेहमिलन सोहळयासाठी व्हॉईस ऑफ मिडीयाच्या राष्ट्रीय कार्यालयीन महासचिव दिव्याताई भोसले, सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आनंद आंबेकर उपस्थित राहुन पत्रकारांना मार्गदर्शन केले. सदर कार्यकम आटोपुन मूल येथील विश्राम गृह येथे प्रथम आगमनाप्रसंगी व्हॉईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे आणि तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान दिव्याताई भोसले यांनी दे धक्का एक्सप्रेस कार्यालयाला सदिच्छा भेट दिल्या, यावेळी दे धक्का एक्सप्रेसचे संपादक भोजराज गोवर्धन आणि कार्यकारी संपादक मंगेश पोटवार यांनी भारताचे संविधान आणि भारताचे कायदे व पुर्वी शुद्र कोण होते? हे पुस्तक भेट दिले. यावेळी व्हाईस ऑफ मीडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, जिल्हा कार्याध्यक्ष गुरूदास गुरनुले उपस्थित होते.
यावेळी दिव्याताई भोसले यांनी दे धक्का एक्सप्रेस समुहाला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.