हरित विसावा मूल नगर परिषदेचा स्तुत्य उपक्रम A laudable initiative of Harit Visava Mul Nagar Parishad

Harit Visava Mul Nagar Parishad
Harit Visava Mul Nagar Parishad

क्षणभर विश्रांतीसोबतच थंड पाण्याची व्यवस्था

मूल (प्रतिनिधी) : उन्हाचा दाहकता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे नागरीकांना पाणी आणि विश्रांती घेता यावे यासाठी नगर परिषदेच्या वतिने चंद्रपूर मार्गावर हरित विसावा तयार केलेला आहे. याविसावामुळे ये-जा करणाऱ्या नागरीकांना आधार झालेला आहे. सदर उपक्रमाबद्दल नागरीकांनी नगर परिषदेचे आभार मानले आहे. A laudable initiative of Harit Visava Mul Nagar Parishad

महाराष्ट्रामध्ये चंद्रपूर जिल्हयात उष्णतेची लाट पसरली आहे, आठ दिवसापासुन हि लाट तिव्र झाल्याने अनेकाना दुपारच्या वेळात घराबाहेर पडण्याचं टाळत आहेत. एरवी भर दुपारी भरभरून वाहणारे रस्ते आता मात्र अघोषित संचारबंदीसारखे निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे, ज्या नागरीकांना अतिशय महत्वाच्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागतो, अशांची गैरसोय होवु नये यासाठी मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांच्या पुढाकारातुन मूल शहरातील चंद्रपूर मार्गावर हरित विसावा तयार केलेले आहे. याठिकाणी नागरीकांना विश्रांती घेण्यासोबतच थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. सदर उपक्रमाचे नागरीकांनी भरभरून कौतुक करीत आहे.

सदर उपक्रमासाठी मूल नगर पालीकेचे पाणी पुरवठा अभियंता श्रीकांत समर्थ, आरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार, आलेख बारापात्रे यांनी सहकार्य करीत आहे.