तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले
मूल (प्रतिनिधी) : पत्रकारांच्या विविध समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी व्हाईस ऑफ मीडिया Vice of Media तालुका मूलच्या वतिने तहसील कार्यालयासमोर धरणे गुरूवारी ठिय्या आंदोलन करून तहसीलदारांमार्फत मुख्यंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.

मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरिव निधी देण्यात यावे, पत्रकारीते पाच वर्षे पुर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्विकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्राना सध्या जाहिरातीवर लागु असलेल्या जिएसटी रद्द करण्यात यावे, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणुन शासकीय भुखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोना संक्रमणात जिव गेलेल्या पत्रकारांच्या कुटुंबियांना फं्रट लाईन वर्करचा दर्जा देवुन त्यानुसार मयत कुटुंबाचे पुर्नवसन करण्यात यावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण क वर्ग यांना मारक आहे, लघु दैनिकांनाही मध्यम ब वर्ग दैनिका इतक्याच जाहिराती देण्यात याव्या अशा मागण्याचे निवेदन मूलचे तहसीलदार डॉ. रविंद्र होळी यांच्या मार्फतीने राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे पाठविण्यात आले.
निवेदन देताना व्हाईस ऑफ मीडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय पडोळे, कार्याध्यक्ष गुरू गुरनुले, प्रसिध्दी प्रमुख भोजराज गोवर्धन, रमेश माहुरपवार, डिजीटल विभागाचे जिल्हाध्यक्ष विजय सिध्दावार, तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार, शशिकांत गणविर, प्रा. चंद्रकांत मनियार, प्रशांत मेश्राम, सचिन वाकडे, बंडु अल्लीवार, संगिता गेडाम, कुमुदिनी भोयर, युवराज चावरे, प्रमोद मशाखेत्री, अमित राउत उपस्थित होते.