कॉंग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार firing

sanyosh Rawat
sanyosh Rawat

राजकीय वर्तुळात खळबळ

मूल (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर अज्ञात इसमांकडुन गोळीबार करण्यात आले असुन रावत यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे. firing सदर घटनेमुळे मूल शहरात खळबळ उडाली आहे. Firing on Congress leader Santosh Rawat

Ravat
Rawat

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत हे मूल येथील शाखेत आपल्या कार्यकर्त्यासह बसुन होते, दरम्यान रात्रौ 9.30 वाजता घराकडे जाण्यासाठी निघाले असता, एका स्विप्ट कार मधुन बुरखाधारी इसमाने त्यांच्यावर गोळीबार केले, यावेळी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी कार पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कार घेवुन पळुन जाण्यास ते यशस्वी झाले. श्री. रावत यांच्यावर गोळीबार करण्यामागचे नेमके कारण अजुन तरी गुलदस्तात आहे. सदर घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी कार्यकर्त्यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोरील मूल गडचिरोली मार्गांवर  रस्ता रोको केला.  घटनास्थळाला अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगडे यांनी भेट दिली.