सेंट अँन्स पब्लिक स्कुलचा 100 टक्के निकाल St. Ann’s Public School

result
result

कु. ग्रिष्मा संजिवकुमार बन्सोड शाळेतुन प्रथम

मूल (प्रतिनिधी) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई ने 10 वीचा निकाल शुक्रवारी जाहिर केला असुन यामध्ये मूल येथील सेंट अँन्स पब्लिक स्कुलने 100 टक्के निकाल दिला आहे. शाळेच्या विद्यार्थींनी कु. ग्रिष्मा संजिवकुमार बंसोड हिला 93.20 टक्के गुण मिळवुन शाळेतुन प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. St. Ann’s Public School result

येथील कु. श्रेया मुकेश तेल्लावार हिला 92.40 टक्के तर अर्गणी मनिष येलट्टीवार हिला 92.20 टक्के गुण मिळवुन शाळेतुन अनुक्रमे दुसरी आणि तिसरी आली आहे. सदर शाळेतील 9 विद्यार्थी 90 टक्केच्या वर गुण मिळविले आहेत, 9 विद्यार्थी हे 80 टक्केच्या वर, 11 विद्यार्थी 70 टक्केच्या वर आणि 1 विद्यार्थी 60 टक्केच्या वर गुण मिळविले आहे.

उतीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याधपिका सिस्टर डोली जोस, शिक्षीका सिस्टर फ्रीडा जोशी, सिस्टर लिंडा अँटॉनी, श्रीमती सारिका चिलबुले, कु. अर्शी सय्यद आणि शिक्षकवृंदानी अभिनंदन केले.