वडेट्टीवारांनी दिला, मंगळवार पर्यंतचा अल्टीमेट Santosh Rawat firing case

Santosh Rawat firing case
Santosh Rawat firing case

अन्यथा जिल्हाभरात वेगवेगळे आंदोलन

मूल (प्रतिनिधी) : कॉंग्रेसचे वजनदार नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्या पक्षात वाढता प्रभाव लक्षात घेता त्यांच्यावर झालेला गोळीबार हा चिंतेचा विषय असुन अशा घटना परत घडु नये यासाठी आरोपींना तिन दिवसात अटक करण्याची मागणी माजी पालकमंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी केली असुन मंगळवार पर्यंतचा अल्टीमेट पोलीस प्रशासनाला दिला आहे. आरोपीला अटक न केल्यास जिल्हयात वेगवेगळे आंदोलने करू असा इशाराही आमदार विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत दिला. Different agitations in the district if the accused are not arrested: MLA Vijay Wadettiwar

रावत गोळीबार प्रकरणाचा तपास एस आय टी मार्फत Mul firing case

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार हे संतोषसिंग रावत यांचे घरी आले होते, यावेळी आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते, आतापर्यंत चंद्रपूर जिल्हयात राजकीय नेत्यावर गोळीबार झालेला नाही, मात्र गुरूवारी कॉंग्रेसचे नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार झालेला आहे, ही बाब अतिशय चिंताजनक असुन परत अशा घटना घडु नये यासाठी आरोपीचा तात्काळ शोध घेवुन त्याला अटक झाली पाहीजे, पोलीस प्रशासन त्यादृष्टीने प्रयत्नशील सुध्दा असल्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगीतले. Santosh Rawat firing case

मूल तालुका हा बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात येतो, यातालुक्याचे नेतृत्व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री करीत आहेत मात्र त्यांच्याकडुनही याबाबत काहीच प्रतिक्रिया आले नाही हे आश्चर्यकारक असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हणाले. आरोपीला अटक न केल्यास येथील गांधी चौकात निषेध सभा घेऊ, त्यांनतर जिल्हयात रस्ता रोको, निषेध आंदोलन आणि बंद पाडुन वेगवेगळे आंदोलन करू असेही वडेट्टीवार यांनी यावेळी पत्रकार परिषदेत सांगीतले.

पत्रकार परिषदेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत, जिल्हा कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे, चंद्रपूर तालुकाध्यक्ष शामकांत थेरे, शहराध्यक्ष नंदु नागरकर, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गंगाधर वैद्य, नितीन उराडे, जिल्हा महिला कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष चित्राताई डांगे, मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, तालुका कॉग्रेस कमेटीचे माजी अध्यक्ष घनश्याम येनुरकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरूदास गुरनुले यांचे सह कॉंग्रेसचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधिक्षकांशी वडेट्टीवारांची चर्चा
कॉंग्रेसचे नेते संतोष रावत यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणाबाबत राज्याचे माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी मूल पोलीस स्टेशन येथे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांच्याशी जवळपास अर्धा तास चर्चा करून प्रकरणाच्या तपासाबाबत माहिती घेतले, आरोपी लवकरच जेरबंद होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. रविंद्रसिंग परदेशी यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना दिल्याने त्यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले.