माजी महिला सरपंचाला शिवीगाळ करणारे अजुनही मोकळेच Ex-woman sarpanch abused

Ex-woman sarpanch abused
Ex-woman sarpanch abused

नागरीकांचा आरोप : उपविभागीय अधिकारी, पोलीस स्टेशनला दिले निवेदन

मूल (प्रतिनिधी) : केळझर येथील माजी सरपंच काजु खोब्रागडे Kaju Khobragade यांना गावातीलच तिन युवकांनी अश्लिल शिवीगाळ केली, याबाबत मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली, त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला, मात्र शिवीगाळ करणारे अजुनही मोकळेच फिरत आहे, यामुळे माजी महिला सरपंचाला त्यांच्यापासुन भिंती निर्माण झाली असुन शिवीगाळ करणारे आशिष पैकुजी बर्रेवार वय 34 वर्षे, पंकज प्रकाश चल्लावार वय 34 वर्षे आणि प्रविण चक्रधर मानकर वय 33 वर्षे रा. सर्व केळझर यांना अटक करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी आणि पोलीस स्टेशन मूल यांचेकडे नागरीकांनी केली आहे.

Ex-woman sarpanch abused1
Ex-woman sarpanch abused1

मूल तालुक्यातील मौजा केळझर येथील काजु मिलींद खोब्रागडे या 2020 मध्ये पार पडलेल्या ग्राम पंचायतच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या, अनुसुचित जातीच्या महिलांसाठी सरपंच पद आरक्षीत असल्याने त्या केळझर ग्राम पंचायतच्या सरपंचपदी निवड झाली होती, मात्र आपसीमतभेदामुळे ग्राम पंचायत सदस्यांनी त्यांच्यावर अविश्वास आणला होता, निवडणुकीच्या खर्चावरून 26 एप्रिल रोजी रात्रौ 9.30 वाजता दरम्यान केळझर येथील आशिष पैकुजी बर्रेवार या 34 वर्षे, पंकज प्रकाश चल्लावार वय 34 वर्षे आणि प्रविण चक्रधर मानकर वय 33 वर्षे यांनी दारूच्या नशेत माजी महिला सरपंच काजु खोब्रागडे यांच्या घरी जावुन तुला आम्ही ग्राम पंचायतच्या निवडणुकीत निवडुण आणण्यासाठी 10 हजार रूपये खर्च केले आहेत, ते तु दे म्हणुन अश्लिल शिवीगाळ केले. याबाबत काजु खोब्रागडे यांनी मूल पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदविली होती, तक्रारीवरून आशिष पैकुजी बर्रेवार या 34 वर्षे, पंकज प्रकाश चल्लावार वय 34 वर्षे आणि प्रविण चक्रधर मानकर वय 33 वर्षे यांच्यावर कलम 354 (अ), 509, 447, 504, 506 34 सहकलम अनुसुचित जाती, जमाती प्रतिबंधक कायदयांवन्ये गुन्हा दाखल केला आहे. मात्र अजुनही त्यांना अटक करण्यात आलेले नाही यामुळे ते मोकळेच फिरत असुन यांच्यापासुन विधवा असलेल्या काजु खोब्रागडे यामहिलेवर कधीही जिवघेण्या हल्ला होवु शकतो यामुळे त्यांना अटक करावी अशी मागणी रमेश मानकर, अशोक रामटेके, विजयाताई रामटेके, गोकुळदास बांबोळे, यशवंत देवगडे, दिलीप गेडाम, मनोहर दुर्गे यांच्यासह नागरीकांनी उपविभागीय अधिकारी व मूल पोलीस स्टेशन मध्ये निवेदन देवुन केली आहे.