प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठीच आरोपी कडुन खोटेे आरोप : संतोषसिंह रावत Rawat firing case

Rawat firing case
Rawat firing case

रावत गोळीबार प्रकरण

मूल (प्रतिनिधी) : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कार्यकर्त्यांशी चर्चा करून घराकडे जात असताना माझेवर गोळीबार करणाÚया आरोपीला पकडण्यास पोलीस प्रशासनाला यश आले असुन पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवुन मुख्य आरोपीपर्यंत पोहचतील असा विश्वास व्यक्त करीत यादवबंधुनी माझेवर केलेल्या 6 लाख रूपयाचा आरोप खोटा असुन माझे डब्लु सि एल सी कोणतेही संबध नसल्याचे खंडण चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत SantoshSingh Rawat यांनी व्यक्त केले. ते मूल येथील बॅंकेच्या शाखेत पत्रकारांशी वार्तालाप करताना बोलत होते. District Central Cooperative Bank

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडणुकीसंबधाने 11 मे रोजी मूल येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेत कार्यकर्त्यांशी चर्चा करून रात्रौ 9.21 वाजता दरम्यान घराकडे जाण्यासाठी निघाले असता स्विप्ट चारचाकी वाहनात बसलेल्या चार इसमांपैकी एकाने माझेवर गोळीबार केलेला होता, सुदैवाने मला काही झालेले नाही, दरम्यान पोलीस प्रशासनाने अथक परिश्रम घेवुन 3 आरोपींना पकडण्यात यश आलेले आहे मात्र अजुनही एक आरोपी पोलीसांच्या तावडीत सापडलेला नाही.

पोलीसांनी यादव बंधुकडुन गोळीबारासंबधाने चौकशी केली असता त्यांनी डब्लु सी एल मध्ये मध्ये नौकरी लावुन देण्यासाठी संतोष रावत यांना 6 लाख रूपये दिलेले आहे, परंतु त्यांनी अजुनही पैसे परत केलेले नाही यामुळे रावत यांच्यावर गोळीबार करावा लावण्याचा बयाण दिल्याचे पोलीस प्रशासनाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगीतले, याबाबत जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी मी यादव यांना ओळखत सुध्दा नाही, ते कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहे म्हणुन मला आता माहित झाले, ते कधी पक्षाच्या मंचावर आले असेल परंतु मला माहिती नाही, त्यामुळे मला त्यांच्याकडुन डब्लु सी एल मध्ये नौकरी लावुन देण्याचा संबधच येत नाही, गोळीबार प्रकरणाला वेगळे वळण देण्यासाठी त्यांनी केलेला हा आरोप खोटा असुन माझे आणी आरोपीची नार्को टेस्ट करावी, यावरून तरी दुध का दुध, पाणी का पाणी होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

पोलीस प्रशासनाकडुन समाधानकारक चौकशी सुरू असुन मुख्य आरोपीचा शोध घेतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती घनश्याम येनुरकर उपस्थित होते.