97 टक्के गुण मिळवुन गौरवी तरोणे तालुक्यातून प्रथम St Anne’s High School Result

St Anne's High School Result
St Anne's High School Result

सेंट अॅन्स हायस्कुलचा निकाल 100 टक्के

मूल (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतिने घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल आज (शुक्रवारी) दुपारी 2 वाजता जाहिर करण्यात आला असून यापरिक्षेत मूल येथील सेंट अॅन्स हायस्कुलची विद्यार्थीनी गौरवी चोपराम तरोणे ही 97 टक्के गुण मिळवुन तालुक्यातुन प्रथम आली आहे तर सेंट अॅन्स हायस्कुलची विद्यार्थीनी संस्कृती प्रदीप वेलपुलवार हीने 93.60 टक्के तर हर्ष चंदु शेडे याने 92.80 टक्के गुण मिळवुन अनुक्रमे व्दितीय आणि तृतीय आले आहे. St Anne’s High School Result

सेंट अॅन्स हायस्कुलचे विद्यार्थी सर्वेश संजय कामडे 92.40 टक्के, रोहीत यशवंत लांजे 91.80 टक्के, अनमोल राजहंस जांभुळकर 91.60 टक्के, प्रथमेश विनोद दांडेकर 91.60 टक्के, रिया नरेंद्र ढोलणे 91.40 टक्के, अश्लेषा चंद्रकांत आष्टणकर 91.20 टक्के, अंकित विनोद कावळे 90.80 टक्के, आस्था चंदन बिलवणे 90 टक्के गुण मिळाले आहे. सेंट अॅन्स हायस्कुल मधील 54 विद्यार्थी परिक्षेला बसले होते त्यापैकी 54 विद्यार्थी पास झाले असुन 11 विद्यार्थी 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवुन पास झाले आहे.

उतीर्ण विद्यार्थ्यांचे शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सॅलेट, वर्ग शिक्षक सिस्टर लिली, मयुर कामडे, धनराज कुडे, अमोल कामीडवार, अर्शाद अन्सारी, प्रतिक नागरेचा आणि शिक्षकवंृदानी अभिनंदन केले.