मूल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रब्बी धान खरेदीचा शुभारंभ
मूल (प्रतिनिधी) : शेतकऱ्यानी उत्पादीत केलेल्या शेतीमाल विक्री करण्याच्या दृष्टीने मूल बाजार समितीने शासकीय आधारभुत केंद्र उघडलेले आहे, याआधारभुत केंद्रात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शासकीय हमीभाव खरेदी योजनेत सहभागी झाले पाहिजे, बाजार आवारात जास्तीत जास्त भावाने शेतमालाची विक्री होत असल्यामूळे गावातच शेतमाल किरकोळ व्यापाऱ्यांना धान विक्री करू नये, शेतकऱ्याना काही समस्या उद्भभवल्यास बाजार समिती कार्यालयाशी संपर्क साधावा, बाजार समितीची संपुर्ण टिम आपल्या पाठिशी आहे असे प्रतिपादन मूल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांनी केले. ते शासकीय हमीभाव अंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती मूलच्या वतिने रब्बी हंगाम 2022-23 उन्हाळी धान खरेदीचा शुभारंभाप्रसंगी बोलत होते. Government Guaranteed Purchase Scheme
कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, संचालक घनश्याम येनुरकर, संदिप कारमवार, सुनिल गुज्जनवार, अखिल गांगरेड्डीवार, .किशोर घडसे, हसन वाढई, सुमीत आरेकर, लहू कडस्कर, राहुल मुरकुटे, शालीक दहिवले, जालींद्र बांगरे, तुलाराम घोगरे, अमोल बच्चुवार, रमेश बरडे, चंदा कामडी, उषा शेरकी, समितीचे प्रभारी सचिव अजय गंटावार उपस्थित होते.
जिल्हा मध्यावर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली व समितीचे सभापती राकेश .रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार व संचालक मंडळ यांनी मनाचा मोठेपणा दाखवून देशाचा पोंशीदा असलेल्या शेतकऱ्यांचे हस्ते उन्हाळी धान खरेदीचा शुभारंभ नुकताच करण्यांत आला.
कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार बाजार समितीचे कर्मचारी राजु गेडाम यांनी केले. कार्यक्रमाला बाजार समितीचे कर्मचारी, शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.