नागरीकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्या : सुमित समर्थ Nationalist Congress Party

Nationalist Congress Party
Nationalist Congress Party

राष्ट्रवादीचा २४ वा वर्धापन दिन थाटात साजरा

मूल (प्रतिनिधी) : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना यश मिळावे यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष प्रयत्नशील आहे, कार्यकर्त्यांनी कामाला लागुन नागरीकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य द्यावे असे आवाहन बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमित समर्थ यांनी अध्यक्षीय स्थानावरून केले. ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजीत केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा वर्धापन दिन सोहळयात बोलत होते. Anniversary celebration of Nationalist Congress Party

10 जुन रोजी आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपुर विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष सुमीत समर्थ होते. प्रमुख अतिथी म्हणुन राष्ट्रवादी काँग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष प्रा. किसन वासाडे, महिला तालुकाध्यक्ष निताताई गेडाम, तालुका सचीव नंदू बारस्कर, शहर सचिव प्रदीप देशमुख, सोशल मीडिया अध्यक्ष शुभम शेंडे, जेष्ठ कार्यकर्ते प्रभाकर धोटे, इंद्रापाल पुणेकर, हेमंत सुपणार, मनोहर शेरकी, बालाजी लेनगुरे, अजय त्रिपत्तीवार, महेश कटकमवार, दिलीप उईके, रोहिदास वाढई, सतीश गुरनुले, राकेश समर्थ, जुगल महाडोळे उपस्थित होते

कार्यक्रमाची सुरूवात थोर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्प माल्यार्पण करून पक्षाचा ध्वज फडकविण्यात आला, ह्यानंतर केक कापून उपस्थित मान्यवरांनी उपस्थित प्रमुख पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्य शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे संचालन दुशांत महाडोळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार शहराध्यक्ष महेश जेंगठे यांनी मानले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.