पत्रकार संघाकडुन नामदार सुधिर मुनगंटीवार यांचा सत्कार Journalist Association

Journalist Association
Journalist Association

मूल (प्रतिनिधी) : राज्याचे सांस्कृतिक कार्य, वन आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधिर मुनगंटीवार यांचा नागरी सत्काराप्रसंगी मूल तालुका पत्रकार संघाच्या वतिने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. Namdar Mungantiwar felicitated by Journalist Association

यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगडे, मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, भाजपाचे शहर सरचिटणीस चंद्रकांत आष्टणकर उपस्थित होते.

नामदार मुनगंटीवार यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांचा नागरी सत्कार कार्यक्रम घेण्यात आला नव्हता, मात्र माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप यांनी मूल येथे नामदार सुधिर मुनगंटीवार यांचा नागरी सत्कार घडवुन आणल्याबद्दल भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. नागरी सत्काराच्या निमीत्ताने मूल तालुका पत्रकार संघाच्या वतिने नामदार सुधिर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला, यावेळी पत्रकार संघाचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.