अभाविपच्या वतिने सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार ABVP News

ABVP News
ABVP News

मूल (प्रतिनिधी) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा मूलच्या वतीने मुल शहरातील सेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन पालकांसंमवेत नुकताच सत्कार करण्यात आला,

शहरातील शुभम सुधाकर डांगे यांचा चिरंजीव हिस्टरी, ओंकार सुभाष चनावार हा गणित विषयात तर कु रागिणी गणेश उमलवार ही प्राणिशास्त्र या विषयात सेट परीक्षा पास झालेली आहे, यातील शुभम डांगे व ओंकार चनावार याचे वडील शिक्षक आहेत, कु रागिणी चे वडील हे शहरात चहा विक्रीचा व्यवसाय करून आपली उपजीविका करीत आहेत.

यशस्वी तिन्ही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी प्रा डॉ सौ किरण कापगते, प्रा डॉ खुशाल राठोड, प्रविनजी मोहुर्ले, सुखदेव चौथाले, प्रज्योत रामटेके, प्रदून्य कंदिकुरवार, प्रा शेंडे, गणेश कावळे, कुणाल शेंडे, यश रामटेके, बालू कोमलवार, पियुष कवाडकर, प्रदीपजी करकाड़े व अभाविपचे कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.