चोरीच्या घटनेने मूल तालुक्यात खळबळ : राजोलीमध्ये दोन ठिकाणी चोरी Theft at two places in Rajoli

Theft at two places in Rajoli
Theft at two places in Rajoli

पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल

मूल (प्रतिनिधी) : मुलांला भेटण्यासाठी बाहेरगावी गेलेल्या राजु देवाजी मेश्राम रा. राजोली आणि सोमाजी लक्ष्मण शेंडे रा. राजोली यांच्या घरातुन मुद्देमाल आणि रोख रक्कम चोरटयांनी चोरून लंबास केल्याची घटना मूल तालुक्यात राजोली येथे शनिवारी रात्रौ 10 वाजता पासुन तर रविवारी 8.30 वाजता दरम्यान घडली. सदर घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Theft at two places in Rajoli

मूल तालुम्यातील मौजा राजोली येथील राजु देवाजी मेश्राम वय 50 वर्षे रा. कन्नमवार नगर राजोली यांच्या घरातील आलमारीमधुन 10 तोडे जुने वापरात असलेले चांदीचे चाळ आणि 8 ग्राम सोन्याची काळा मण्याची पोत अज्ञात आरोपीने चोरून नेले सदर मुद्देमालाची किंमत 25 हजार आहे. तर राजोली येथीलच सोमाजी लक्षमण शेंडे वय 32 वर्षे रा. कन्नमवार नगर राजोली यांच्या घरातील आलमारीच्या लॉकर मधील 42 हजार रूपये रोख आलमारीचे लॉकर तोडुन अज्ञात चोरटयांनी चोरून लेले, अज्ञात आरोपीविरूध्द मूल पोलीस स्टेशन येथे  कलम 457, 380 भादवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार राजेश शेंडे करीत आहे.

मूल येथील मोबाईल शॉपी फोडण्याचा प्रयत्न
दोन दिवसापुर्वी मूल येथील श्री. साईराम मोबाईल शॉप फोडण्याचा प्रयत्न एका चोरटयांनी केला होता मात्र मोबाईल शॉप फोडण्यात तो अपयशी इरला, याबाबतही मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे, सदर चोरटा हा सि सी टी व्ही फुटेज मध्ये दिसत आहे मात्र अजुनही मूल पोलीसांनी चोरटयांचा शोध घेतलेला नाही हे विशेष.