वाघाच्या हल्लात शेतकरी गंभीर जखमी Farmer seriously injured in tiger attack

tiger attack
tiger attack

मूल (प्रतिनिधी) : गुरे चराईसाठी शेतात घेवुन जाणाऱ्या  शेतकऱ्या वर वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना बेलघाटा Belghata  गावाजवळ घडली. सेवक सयाजी कोवे sevak sayaji kove  वय 55 वर्षे रा. बेलघाटा असे वाघाच्या हल्लात जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे. Farmer seriously injured in tiger attack

मूल तालुक्यातील मौजा बेलघाटा येथील शेतकरी सेवक सयाजी कोवे वय ५५ वर्ष हे बेलघाटा गावालगतच्या शेतात गूरे चराई करीत होते. दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने दुपारी 2 वाजता दरम्यान त्यांचावर हल्ला करुन गंभीर जखमी केल.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक आर. व्ही. धनविजय, वनरक्षक एस. डब्लू. बोनलवार व बेलघाटा चे पोलीस पाटील चंद्रशेखर येरमे यांनी घटनास्थळी जाऊन जखमी शेतकऱ्या ला मूल उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेे, प्राथमिक उपचारानंतर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर घटनेमुळे गावकÚयांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.