विरोधी पक्षनेतेपदी आ. विजय वडेट्टीवार यांची निवड Selection of Vijay Vadettiwar

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar

मुंबई (प्रतिनिधी) : अजित पवारांनी सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त झाले होते. या जागेवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही दावा करण्यात येत होता. नियमानुसार, विधानसभेत ज्याचे सर्वाधिक सदस्य त्याचा विरोधी पक्षनेता असं सूत्र आहे त्यानुसार, महाविकास आघाडीत आता सर्वाधिक सदस्य काँग्रेसचे असल्याने विरोधी पक्षनेते पदही काँग्रेसला देण्यात आले आहे. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेतेपदी ब्रम्हपुरी मतदारसंघाचे आमदार विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. विजय वडेट्टीवार यांच्यासोबत संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांची नावे चर्चेत होतीत. मात्र काँग्रेस हायकमांडने विजय वडेट्टीवारांकडे ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. Along with Vijay Wadettiwar, the names of Sangram Thopte, Ashok Chavan, Balasaheb Thorat and Nana Patole were in discussion.

पावसाळी अधिवेशनाला सुरूवाता झाली आहे मात्र तरीसुद्धा सभागृहामध्ये विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झालेली नव्हती. विजय वडेट्टीवार यांच्याकडे दुसऱ्यांदा विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी आली आहे. याआधी 2019 मध्ये वडेट्टीवार यांच्याकडे हे पद देण्यात आलं होतं.

विजय वडेट्टीवार यांच्यावर हायकमांडने विश्वास दाखवल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांणा उधाण आलं आहे. काँग्रेस पक्षामध्ये माजी मुख्यंत्री अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि आताचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ही जबाबदारी जाईल असं बोललं जात होतं. मात्र वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार ओबीसी नेते असून विदर्भामध्ये त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. अजित पवार यांच्या जाण्याने महाविकास आघाडीमध्ये मोठी पोकळी झाली होती. सभागृहात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे मोठे नेते सरकारमध्ये असल्याने विरोधी पक्षालाही आक्रमकपणे जनतेचे प्रश्न मांडणारा नेता हवा होता.