चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक : एक जण जागीच ठार four-wheeler collided with a two-wheeler

accident
accident

मूल-सावली मार्गावरील घटना 

मूल (प्रतिनिधी) : शेतावर जाण्यासाठी निघालेल्या एका दुचाकी स्वाराच्या दुचाकीला चारचाकी वाहन चालकाने धडक दिल्याने दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना मूल-सावली मार्गावरील चिमढा नदीजवळ मंगळवारी सकाळी 11 वाजता दरम्यान घडली. विवेक नामदेव कन्नाके वय 30 वर्षे रा. चकमानकापूर असे अपघातात ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नांव आहे. four-wheeler collided with a two-wheeler,  One person died on the spot

सावली तालुक्यातील चक मानकापूर येथील विवेक नामदेव कन्नाके यांची शेती मूल तालुक्यातील नलेश्वर येथे आहे. मंगळवारी सकाळी शेतावर दुचाकी क्रं. एम एच 34 बि एन 1406 ने जात होता तर वर्धा येथील विनोद लक्ष्मण आगरेकर वय 50 वर्षे हे चारचाकी वाहन क्रं. 32 ए एस 6567 ने गडचिरोली येथे जात होते, दरम्यान चिमढा नदीजवळ चारचाकी वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण गेल्याने दुचाकीला धडक दिली, या भिषण अपघातात दुचाकी चालक विवेक नामदेव कन्नाके याचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान मृत्तकावर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. accident

घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनल देण्यात आली, वाहन चालकावर मूल पोलीस स्टेशन येथे कलम 279, 304 (अ) भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.