मुलींनो अबला नाही तर सबला बना: प्रा किरण बोरकर (कापगते) Rajmata Jijau Self Defense Training

Rajmata Jijau Self Defense Training
Rajmata Jijau Self Defense Training

सावली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्याच्या संरक्षणासाठी पॉस्को सारखे अनेक कायदे तयार करण्यात आलेले आहे मात्र कायद्याला न जुमानता अनेकांवर पॉस्को अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहे, विद्यार्थींनी कराटे सारखे प्रशिक्षण प्रत्येकांनी घेऊन आत्मरक्षक झाले पाहिजे, म्हणुन मुलीनो अबला नाही तर सबला बना असे प्रतिपादन राष्ट्रपिता महात्मा गांधी विद्यालय सावलीच्या प्राध्यापक डॉ. किरण बोरकर (कापगते) Kiran Borkar (Kapgate) यांनी मुख्य समुपदेशक म्हणुन व्यक्त केले. त्या भारतीय महिला व बालविकास विभागच्या वतिने आयोजित राजमाता जिजाऊ स्वरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सावली येथील विश्वशांती विद्यालयात नुकताच पार पडला, Rajmata Jijau Self Defense Training

Rajmata Jijau Self Defense Training1
Rajmata Jijau Self Defense Training1

यावेळी बाल विकास विभागााचे बिंबिसार, बाल विकास विभागााचे सरंक्षण अधिकारी भसारकर, विश्वशांती विद्यालयाचे प्राचार्य रवींद्र मुपावार, कराटे प्रशिक्षक रंगनाथ पेडुकर उपस्थित होते,

कार्यक्रमाचे संचालन प्रदीप कोहळे यांनी केले, यावेळी विश्वशांती विद्यालयाचे शिक्षकवृंद, कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.