विविध मागण्यांसाठी स्वातंत्र्यदिनांपासुन जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण Fasting in front of Collector office since independence days

Ashok Margenwar
Ashok Margenwar

चांदापूरच्या उपसरपंचासह नागरीकांचे उपोषण

मूल (प्रतिनिधी) : घरकुल ड यादीचे हेराफेरी व वनावट यादी प्रशासनास सादर केल्याने प्रशासनाची व गावातील जनतेची फसवणुक करणाऱ्या सरपंच व त्यांना सहकार्य करणारे नोडल अधिकारी, गटविकास अधिकारी यांना निलंबित करून फौजदारी कारवाई करण्याच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार व गावकऱ्यानी स्वातंत्र्यदिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदनाव्दारे दिली आहे. Fasting in front of Collector office since independence days

Fasting in front of Collector office since independence days
Fasting in front of Collector office since independence days

मूल तालुक्यातील मौजा चांदापूर येथील घरकुल ड यादीचे फेराफेरी व बनावट यादी प्रशासनास सादर केल्याने प्रशासनाची व गावातील जनतेची फसवणुक केल्याने व दोष सिध्द झाल्याने सरपंच सोनी देशमुख यांना पदावरून बडतर्फ करून त्यांचेवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, सरपंचाच्या बेकायदेशिर व नियमबाहय कामांमध्ये सहकार्य करणारे नोडल अधिकारी, गटविकास अधिकारी  यांना निलंबित करून फौजदारी कारवाई करण्यात यावी, चांदापूर ग्राम पंचायतचे प्रभारी ग्रामसेवक नन्नावरे हे 2 किमी अंतरावरील भवराळा येथील रहिवासी असुन चांदापूर ग्राम पंचायतमध्ये नियमबाहय कारभार करीत असल्याने त्यांच्याकडुन चांदापूर ग्राम पंचायतचा प्रभार काढण्यात यावे व चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे यासह विविध मागण्यासाठी स्वातंत्र्यदिनापासुन चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चांदापूरचे उपसरपंच अशोक मार्गनवार व गावकरी आमरण उपोषणाला बसणार आहेत.

श्री. मार्गनवार हे स्वातंत्र्यदिनापासुन आमरण उपोषणाला बसण्याचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्यकार्यपालन अधिकारी आणि पोलीस अधिक्षक यांच्याकडे दिले आहे. सदर उपोषणाच्या इशारामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.