कृषी उत्पन्न बाजार समिती परीसरात वृक्षारोपण Plantation of trees in APMC premises

Plantation of trees in APMC premises
Plantation of trees in APMC premises

मुल (प्रतिनिधी) : स्वातंत्र दिनाचे औचित्य साधुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. Plantation of trees in APMC premises

यावेळी बाजार समितीचे उपासभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती तथा संचालक घनश्याम येनुरकर, संदिप कारमवार, किशोर घडसे, लहू कडस्कर, सुमीत आरेकर, शालीक दहिवले, अमोल बच्चुवार, चंदाताई कामडी, रमेश बरडे, समितीचे प्रभारी सचिव अजय गंटावार, माजी संचालक धनजंय चिंतावार, मारोती चिताडे उपस्थित होते.

पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस धासळत चाललेला असुन प्रदुषणामध्येही वाढ होत आहे यामुळे मूल कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी शेकडो वृक्षांचे रोपण करण्यात आले.

यावेळी सुभाष प्राथमीक शाळा, जिल्हा परिषद प्राथमीक शाळेचे विद्यार्थी व विदयार्थीनी व शिक्षकवृंद, व्यापारी, अडत्ये, हमाल, मापारी मदतनिस व समितीचे सर्व कर्मचारी वृंद आणि नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.