महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटना उतरली मैदानात
मूल (प्रतिनिधी) : विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी फिस्कुटी ग्राम पंचायतने Fiskuti Gram Panchayat 18 ऑगष्ट रोजी ग्रामसभेचे Gram Sabha आयोजन केले होते, दरम्यान सभेतील विषयांवर चर्चा सुरू असताना रोजगारसेवक दिनेश वंजारी Dinesh Wanjari यांनी योजनेची माहिती देत असताना कैलास चौधरी Kailas Chaudhari यांनी रोजगार सेवकांवर प्राणघातक हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला, अशाच प्रकारचे हल्ले जिल्हयातही होऊ शकतो यामुळे कैलास देवाजी चौधरी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्राम रोजगार सेवक संघटनेने केली असुन गैरअर्जदारांवर कारवाई न केल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशाराही निवेदनातुन दिला आहे. Maharashtra State Gram Rojgar Sevak Association
चंद्रपूर जिल्हयात अनेक प्रकरणात चर्चेत असलेल्या मूल तालुक्यातील मौजा फिस्कुटी ग्राम पंचायतच्या ग्राम सभेत रोजगार सेवकाला मारहाण केल्याचे प्रकरण पुढे आले आहे. 18 ऑगष्ट रोजी मूल तालुक्यातील फिस्कुटी ग्राम पंचायतच्या वतिने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभेमध्ये तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करणे, मनरेगा अंतर्गत लेबर बजेट तयार करणे असा अनेक विषयांवर चर्चा सुरू होती, यावेळी रोजगार सेवक दिनेश गोपाळा वंजारी यांनी योजनेची माहिती देत असताना कैलास देवाजी चौधरी यांनी ग्रामसभेमध्ये येवुन घरकुल रद्द झाल्याबरून वादविवाद करण्यास सुरूवात केले, यावेळी रोजगारसेवक दिनेश वंजारी यांच्यावर प्राणघातक हल्ला करून मारहाण केले. Employment worker Dinesh Vanjari was assaulted and beaten
रोजगारसेवक हे ग्रामस्तरावर शासनाची सेवा करीत आहेत, त्यामुळे भविष्यात जिल्हयात अशा प्रकारणाचा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे गैरअर्जदार कैलास चौधरी यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावे लागेल अशा इशारा तहसीलदार मूल आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती, मूल यांना निवेदनातुन दिला आहे.