राजगड परिसरात वाघाची दहशत Terror of the tiger

Terror of the tiger
Terror of the tiger

बंदोबस्त करण्याची चंदू पाटिल मारकवार यांची मागणी

मूल (प्रतिनिधी) : तालुक्यातील राजगड Rajgad येथे वाघाची भिती निर्माण झाली आहे.येथील डोंगरावर काही गावक-यांना सोमवारी वाघ आढळून आला.याची माहिती वनविभागाला देण्यात आली. वाघाला ट्रप करण्यासाठी डोंगरावर कॅमेरे लावण्यात आले आहे.दरम्यान, वाघाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी येथील उपसरपंच चंदू पाटिल मारकवार Upsarpanch Chandu Patil Marakwar यांनी केली आहे. Terror of the tiger

Terror of the tiger1
Terror of the tiger1

राजगड येथील सुनिल गेडाम हा युवक पायथ्याशी असलेल्या डोंगरावर काटवल तोडण्यासाठी डोंगरावर चढला. त्याच्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढविला. मात्र त्याच्या हातात काठी असल्याने त्याने वाघाचा हल्ला परतवून लावला. ही माहिती चंदू पाटिल मारकवार यांना माहित होताच त्यांनी वनविभागाला कळविले.सावली वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली.त्यांना वाघाचे पर्गमार्क आढळून आले. त्यांनी वाघाला शोधण्यासाठी मोहीम राबविली.तसेच डोंगरावर कॅमेरे लावले आहेत. बोरचांदली ते चांदापूर रस्ता ओंलाडून वाघाने राजगडच्या शेतशिवारातून डोंगरावर चढला असावा असा अंदाज बाधण्यात येत आहे. दरम्यान,या घटनेने राजगड आणि आजूबाजूच्या गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात खरीप शेतीचा हंगाम सुरू आहे.सर्वत्र धान पिकाची रोवणी सुरू आहे.यासाठी शेतक-यांना आणि शेतमजूरांना शेतात जावे लागते.त्यामुळे शेतक-यांमध्येही दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघाच्या दहशतीमुळे खरीप हंगाम धोक्यात येवू शकतो.त्यामुळे वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाने तात्काळ पावले उचलावी अशी मागणी चंदू पाटिल मारकवार यांनी केली आहे.

शासनाने ग्रामपंचायतला ड्रोन कॅमेरे पुरवावे
मूल तालुक्यात वाघासह इतर वन्यप्राण्यांचा मोठा संचार आहे.जंगलातील प्राणी गावा शेजारी येवू लागल्याने गावक-यांमध्ये आणि शेतक-यांमध्ये मोठे भितीचे वातावरण आहे.दिवसेंदिवस मानव आणि वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचत आहे. ग्रामिण भागातील मुख्य व्यवसाय शेती हा आहे. उदरनिर्वाहाचे साधन शेती असल्याने शेतक-यांना शेती शिवाय पर्याय नाही. वाघाच्या दहशतीमुळे शेतीच धोक्यात सापडली तर जगायचे कसे?ही विवंचना तालुक्यातील शेतक-यांना आहे. जंगलातील वाघ वाचवा पण गावाशेजारी येणा-या वाघांचा बंदोबस्त करा. गावकरी आणि शेतक-यांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीला ड्रोन कॅमेरे पुरवावे अशी मागणी राजगडचे उपसरपंच चंदू पाटिल मारकवार यांनी केली आहे. ड्रोन कॅमे-याच्या माध्यमातून गावाशेजारी येणा-या वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवण्यासाठी मदत होईल.अशी अपेक्षा चंदू पाटिल मारकवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच वनविभागाकडे मनुष्यबळाची मोठी कमतरता आहे.गावात घटना घडल्यास एकच बीट वनरक्षक दाखल होतो. एकाच वनरक्षका कडे सात सात गावाचा डोलारा असल्याने घटनेला तात्काळ न्याय देण्यास उशिर होतो.त्यामुळे वनविभागातील रिक्त पदे सुदधा शासनाने भरावी अशी मागणी चंदू पाटिल मारकवार यांनी केली आहे.