जिल्हा क्रिडा संकुल समितीच्या अशासकीय सदस्यपदी प्रभाकर भोयर यांची निवड District Sports Complex Committee

Prabhakar Bhoyer
Prabhakar Bhoyer

मूल (प्रतिनिधी) : क्रिडा क्षेत्राच्या विकास व प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या जिल्हा क्रिडा संकुल समितीच्या अशासकीय क्रिडा तज्ञ सदस्य म्हणुन मूल येथील भाजपाचे शहर अध्यक्ष प्रभाकर भोयर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. Selection of Prabhakar Bhoyer as non-governmental sports expert member of District Sports Complex Committee

जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्या आदेशान्वये जिल्हा क्रिडा संकुल समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. यासमितीमध्ये मूल येथील भाजपाचे शहर अध्यक्ष, योग प्रशिक्षक व क्रिडा क्षेत्रात वेगवेगळे पुरस्कार प्राप्त असलेले प्रभाकर भोयर यांची अशासकीय क्रिडा तज्ञ सदस्य म्हणुन सन 2023-24 या वर्षाकरीता निवड करण्यात आलेली आहे,

समितीच्या सदस्यपदी निवड करण्यासाठी शिफारस केल्याबद्दल जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांचे नवनियुक्त अशासकीय सदस्य प्रभाकर भोयर यांनी आभार मानले. जिल्हा क्रिडा समितीच्या अशासकीय सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मूल नगर पालीकेचे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, माजी सभापती प्रशांत समर्थ, शहर भाजपाचे महामंत्री आशुतोष सादमवार, अभिजीत पुरम, सुधीर भोयर यांनी अभिनंदन केले.