मूल नगर परिषदेचा अभिनव उपक्रम
मुल (प्रतिनिधी) : नगर परिषदेशी निगडीत समस्या आता क्यु आर कोंडवरूनही नोंदविता येणार असुन हा अभिनव उपक्रम मूल नगर पालीकेने प्रथम राबवित असल्याने मूलच्या समस्या सुटण्यास मदत लागणार असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. You can also register a complaint on QR code
मूल नगर पालीकेचे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार यशवंत पवार Yashwant Pawarयांनी मूल नगर पालीकेत मुख्याधिकारी पदाचा पदभार स्विकारताच अनेक उपक्रम हाती घेतले असुन त्यांनी मूल शहरातील जनतेच्या कोणतीही समस्या सोडविण्यासाठी आवक जावक विभागाशिवाय क्यु आर कोड वरूनही तक्रार स्विकारणार आहेत. सदर अभिनव उपक्रमाचे नागरीकांनी स्वागत केले आहे. An innovative initiative of Mool Nagar Parishad
क्यु आर कोडवर प्राप्त झालेल्या तक्रारी सोडविण्यासाठी नगर पालीका प्रशासन प्रयत्नशील असुन नागरीकांनी सदर क्यु आर कोडचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्याधिकारी यशवंत पवार यांनी केले आहे.







