विज पडून मृत्यू व जखमी झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत Financial assistance to families

Financial assistance to families
Financial assistance to families

मूल (प्रतिनिधी): तालुक्यातील चिचाला Chichala येथील शेतकरी मजूर महिला धान पिकातील निंदणाचे काम करीत असताना 1 ऑक्टोंबर रोजी पडलेल्या विजेमुळे एक महिला जागीच ठार तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. त्यांच्या कुटुंबियाना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या कडुन त्यांना आर्थीक मदत देण्यात आली. Financial assistance to families

तालुक्यात धानपिकाचे उत्पन्न घेणारे शेतकरी मोठया संख्येने असल्याने मूल तालुक्यात राईस मिल भरपूर प्रमाणावर आहेत, शेतीचे उत्पन्न घेताना शेतातील निंदण काढणे आवश्यक असते, दरम्यान तालुक्यातील चिचाळा येथील एका शेतकÚयाच्या शेतात निंदणाचे काम करीत असताना 1 ऑगष्ट रोजी अचानक वादळी वारा, पाऊस सोबतच विज पडल्याने चंद्रकला संजय वैरागडे ही जागीच ठार झाली तर आशाताई रविंद्र बुरांडे हया गंभीर जखमी झाल्या. सदर घटनेमुळे वैरागडे कुटुंब पोरका झाल्याने गरीब शेतकरी कुटुंबाची फार मोठी हानी झाली. तर बुरांडे कुटुंबावर अचानक संकट आल्याने पत्नीच्या उपचारासाठी पतीला आर्थिक मदतीसाठी धावपळ करण्याची वेळ आल्याने दोन्ही कुटुंब आर्थिक संकटात सापडल्याने जिल्हा मध्यवती सहकारी बॅकेचे अध्यक्ष, कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांनी चिचाळा येथे जावुन वैरागडे कुटुंबियांचे सांत्वन करुन त्यांना धीर दिला व 10 हजार रूपये रोख आर्थिक मदत दिली. तसेच जखमी झालेल्या बुरांडे यांच्याही घरी जाऊन त्यांचीही विचारपुस केली. उपचाराबाबत त्यांना धीर दिला. आणि ५ हजाराची आर्थिक मदत त्यांना दिली.

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार, माजी सभापती व विद्यमान संचालक घनश्याम येनुरकर, कांग्रेस तालुका अध्यक्ष गुरु गुरनुले, आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, बाजार समितीचे माजी संचालक डॉ. पद्माकर लेनगुरे, ग्राम पंचायत उपसरपंच सूरज चलाख, माजी उपसरपंच यशवंत चलाख, तेजराज ठेमस्कर, जनार्दन आत्राम, ग्राम पंचायत सदस्य सौराज इटकेलवार, दीपक मेश्राम, वासुदेव बुरांडे, बालाजी निकूरे, सुखदेव वासेकर, संजय टिकले उपस्थित होते.