राजकीय दबावातुन आम्हचेवर गुन्हे दाखल Crime filed

Crime filed
Crime filed

राहुल प्रेमलवार यांचा पत्रकार परिषदेत आरोप

मूल (प्रतिनिधी): जादुटोण्याच्या नावाखाली गेल्या 5-6 महिण्यापासुन वार्डातील शांतताभंग करणाऱ्या  बोर्डावार परिवारांना जाब विचारण्यासाठी गेले असता, मारझोड केल्याचा आरोप करून माझेसह तिघांजणावर मूल पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला आहे, मूल पोलीसांनी चौकशी न करता राजकीय दबावात येवुन माझेवर गुन्हा दाखल केल्याचा आरोप राहुल प्रेमलवार Rahul Premalwar यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. Crime filed

दर्पण सार्वजनिक वाचनालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राहुल प्रेमलवार यांनी सांगितले की, मागील अनेक दिवसांपासुन वार्डात जादुटोण्याच्या संशयावरून आकाश शरद बोर्डावार यांच्या कुटुंबियाकडुन वार्डातील नागरीकांची अश्लील शिवीगाळ करीत होते, दरम्यान शनिवारी 13 ऑक्टोंबर रोजी रात्रौ 11 वाजता दरम्यान एक वैद्य बोर्डावार यांच्या घरी आला होता, त्याला जादुटोण्याबाबत माहिती विचारण्यासाठी वार्डातील काही युवकांसोबत गेलो होते, यावरून बोर्डावार कुटुंबियांनी तुम्ही आलेच कसे काय म्हणुन आमचेशी वाद करून मूल पोलीस स्टेशनला Mul Police Station आमचे विरूध्द मारहाण केल्याची तक्रार केली, तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे  ईश्वर लोनबले, बादल बावनवाडे, छोटु तोटावार आणि माझेवर गुन्हा दाखल केलेला आहे. मूल पोलीसांनी चौकशी करून गुन्हे दाखल न करताच राजकीय दबावाखाली येवुन आमचेवर गुन्हे दाखल केलाचा आरोपही राहुल प्रेमलवार यांनी पत्रकार परिषदेत केला.

शनिवारी रात्रौ आम्ही कोणलाही मारहाण केलेली नाही, वारंवार जादुटोण्याचा आरोप आमचेवर करीत असल्याने, केवळ आरोप करू नका तर आम्ही जादुटोणा कसे करतो तर पुरावे दया म्हणुन विचारायला गेलो होतो, तरीही मूल पोलीस स्टेशन येथे बोर्डावार यांच्या तक्रारीवरून आमचेवर मारहाणीचा गुन्हा दाखल केलेला आहे, त्यामुळे मूल पोलीसांनी घटनास्थळाची चौकशी करून बोर्डावार कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली आहे. पत्रकार परिषदेला राहुल प्रेमलवार, ईश्वर लोनबले, बादल बावनवाडे, रागिीना कोलपुलवार, मारोती मेश्राम यांचेसह वार्डातील शेकडो महिला, पुरूष उपस्थित होते.

वैद्यकीय अहवालावरूनच गुन्हा दाखल: पोलीस निरीक्षक परतेकी
मूल पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून फिर्यादी महिलेला उपजिल्हा रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता पाठविण्यात आले होते, वैद्यकीय अधिकाऱ्यानी दिलेल्या अहवालानुसारच गुन्हा दाखल केला आहे, यात राजकीय दबावाचा प्रश्नच येत नसल्याचा खुलासा मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी केला आहे.