वनमंत्र्याच्या विधानसभा क्षेत्रात आदिवासी बांधवांचा वनविभागासमोर ठिय्या आंदोलन Thiya Movement

Thiya Movement
Thiya Movement

 पोलिसांचा कडक बंदोबस्त

आशिष कावटवार, पोंभुर्णा :-पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथे आदिवासी संस्कृतीची झालेली अवहेलना प्रकरणी पोंभूर्णा वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर वनविभागाच्या विरोधात आदिवासी नेते जगन येलके यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेला आहे. यावेळी शेकडोच्या संख्येने नागरीक उपस्थित आहेत. जोपर्यंत आमचे मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत आम्ही इथून हटणार नाही असा पवित्रा घेण्यात आला आहे. Thiya Movement

Thiya Movement
Thiya Movement

पोंभूर्णा येथील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क येथे आदिवासी संस्कृती दर्शविणारे जे पुतळे मांडण्यात आले होते ते वनविभागाने तोडफोड केली होती व आदिवासींचा झेंडा काढून फेकल्यामुळे सर्व आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.त्यामुळे जो पर्यंत संबंधितावर गुन्हे दाखल होणार नाही तो पर्यंत तो पर्यंत आम्ही इथेच ठिय्या मांडून बसू असा पवित्रा घेण्यात आला होता.

वनविभागाकडून जी विटंबना केली जात आहे ती आदिवासी समाज खपवून घेणार नाही या प्रमुख मागणीसाठी आदिवासी बांधव पोंभूर्णा येथील वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलन करण्यात आले. जो पर्यंत संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात येणार नाही तो पर्यंत आम्ही इथून हटणार नाही हा पवित्रा घेत रात्रभर आदिवासींचा ठिय्या आंदोलन सुरू होता.

आंदोलनाचे प्रमुख मागण्या इको पार्क मध्ये आदिवासी संस्कृतीची जी विटंबना झाली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे, इको पार्कला क्रांतीवीर बाबुराव शेडमाके यांचे नाव देण्यात यावे, इको पार्कचे कंत्राट वंदन विकास केंद्राला देण्यात यावे, अशी प्रमुख मागणी आहे.यावेळी आंदोलनकर्त्यांनी कार्यालयाच्या आवारातच जेवण बनवले होते .जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तो पर्यंत हटणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.