मूल तालुक्यातील कांतापेठ येथील घटना
मूल (प्रतिनिधी) : गुरे चराईसाठी नेलेल्या एका गुराख्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं. 523 मध्ये दुपारी 4 वाजता दरम्यान उघडकीस आली. बंडु विट्ठल भेंडारे Bandu Bhendare वय 58 वर्षे रा. कांतापेठ असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या इसमाचे नांव आहे. Cowherd killed in tiger attack
मूल तालुक्यातील मौजा कांतापेठ येथील बंडु विट्ठल भेंडारे हे गुरांना चराईसाठी जंगलाकडे घेऊन गेले होते, दरम्यान दुपारी 3.39 वाजताच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या जंगलाकडुन गुरे धावत येत असल्याने कांतापेठ येथील काही नागरीकानी बघितले, याबाबत नागरीकांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्याना माहिती दिली. वनकर्मचारी आणि गावकऱ्यानी वनविकास महामंडळाच्या कांतापेठ बिटातील कक्ष क्रं. 523 मध्ये शोधाशोध केली असता बडु विट्टल भेंडारे यांच्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याचे दिसले. याबाबत वनकर्मचाऱ्यानी वरिष्ठ अधिकाऱ्याना माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी घटनास्थळाला पोहचुन पंचनामा करीत आहे. शव उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले आहे.
घटनास्थळाला वनविकास महामडळाचे सहा. उपवनसंरक्षक खामकर, वनपरिक्षेत्राधिकारी बोथे, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांनी भेट दिली. घटनास्थळावर वनविभाग आणि पोलीस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.