ट्रक-चारचाकी वाहनाचा भीषण अपघात terrible accident

terrible accident
terrible accident

चारचाकी वाहन चालक गंभीर जखमी

चंद्रपूर (प्रतिनिधी): लक्कडकोट चेक पोस्ट जवळ ट्रक व चारचाकी वाहनामध्ये झालेल्या भीषण अपघातात चारचाकी वाहन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना राजुरा आसिफाबाद मार्गावर सायंकाळी 5 वाजता दरम्यान झाला. terrible accident

राज्यमहामार्ग असलेल्या राजुरा-असिफाबाद हा मार्ग अतिशय वर्दळीचा आहे, यामार्गावरून नेहमीची जडवाहतुक होत होत असते. दरम्यान शनिवारी सायंकाळी 5 वाजता दरम्यान ट्रक क्रमांक .ए. पी.24 टी. ए.8335 हे वाहन तेलंगना वरुन नारियाल भरून जबलपूर कडे जात असताना विरुद्ध दिशेने येत असलेल्या चारचाकी वाहन क्र. एम. एच.01 बी. एफ. 9763 या वाहनामध्ये जोरदार धडक बसल्याने चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा झाला. सदर अपघातात चारचाकी वाहनाचा चालक गंभीर जखमी झाल्याने त्याला चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. चारचाकी वाहन चालकाचे नाव राठोड असून हा चेक पोस्ट लाकडकोट कर्मचारी असल्याचे समजते. Rajura-Asifabad