पायलट बंधाऱ्यामुळे चिरोली परिसरातील शेतकऱ्यात नवसंजिवनी Pilot Dam

Pilot Dam
Pilot Dam

जवळपास आठशे हेक्टर शेतीतुन रब्बी पिकांची लागवड

मूल : सिंचनाची अपुरी व्यवस्था असलेल्या मूल तालुक्यात दिवसेंदिवस सिंचनाचा प्रश्न काही प्रमाणात सुटताना दिसत आहे, मूल तालुक्यातील जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील चिरोली-सुशीच्या मध्यभागी असलेल्या नदीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने सन 2019 मध्ये केवळ सहा महिण्यात सुमारे 2 कोटी रूपये खर्च करून बंधाऱ्याचे बांधकाम पुर्ण केले. त्याबंधाऱ्याचे पाणी सुमारे साडेपाच किमी अंतरापर्यंत साठुन राहतेे. यामुळे Chiroli चिरोली परिसराील शेतकऱ्याना रब्बी मोसमातही पिकाची मोठया प्रमाणात लागवड करीत असल्याने शेतकऱ्यात नवसंजिवनी निर्माण झालेली आहे. Pilot Dam

तालुक्यातील जानाळा-पांेभुर्णा मार्गावरील चिरोली ते सुशीच्या मध्यभागातून अंधारी नंदीचा मोठा प्रवाह वाहत असतो, याठिकाणी 90 मीटर लांब असलेल्या मोठया पुलाचे बांधकाम सन 2015-16 या वित्तीय वर्षात पुर्ण झाले, अंधारी नंदीच्या दोन्ही बाजुला सुशी, चिरोली व परिसरातील शेतकऱ्याची शेती आहे, याशेतातुन नदीतील पाणी अडुन राहात नसल्याने दरवर्षी केवळ खरीप हंगामात धानाचे उत्पन्न शेंतकरी घेत होते, शेतकऱ्यावरील सिंचनाची समस्या पुर्ण करण्यासाठी राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी चांदा ते बांधा योजनेअंतर्गत 193.31 लक्ष रूपयांची प्रशासकीय मान्यता प्रदान करून घेतली, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले, तत्कालीन शाखा अभियंता रूपेश बोदडे यांनी अथक परिश्रम घेवून जानेवारी 2019 पासुन प्रत्यक्षात याकामाला सुरूवात केले आणि केवळ 6 महिण्यात सदर बंधाÚयांचे काम पुर्ण केले. Namdar Sudhir Mungantiwar

सुमारे 90 मीटर लांब असलेल्या याबंधाऱ्याची उंची 3.50 मिटर आहे, 3.93 लक्ष घनमीटर याबंधाऱ्यांची साठवण क्षमता असल्यामुळे बंधाऱ्यांचे पाणी सुमारे साठेपाच किमी अंतरापर्यत साठवणुक करता येतो, यापाण्यामुळे चिरोली, केळझर, सुशी, महादवाडी व परिसरातील शेतकऱ्यांना याबंधाऱ्यातील पाण्याचा लाभ घेत आहे. अतिषय नियोजनबध्द बंधाऱ्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग मूल च्या माध्यमातुन करण्यात आले असून याबंधाऱ्यातील पाणी जवळ असलेल्या 4 तलावात सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सोडण्यात येतेे आहे. आणि या 4 तलावातील पाणी इतर 5 मामा तलावात सौर ऊर्जेच्या माध्यमातुन सोडण्यात येतेे. यामुळे परिसरातील जवळपास आठशे हेक्टर शेतांमधुन दुबार पेरणी करून भरघोष पिक घेता येतोे. दरम्यान गेल्या दोन वर्षापासुन काही शेतकरी दुपार आणि तिबार पेरणी करून भरघोष उत्पन्न घेत आहेत. सदर बंधाऱ्यांचे कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागातील निवृत्त सचिव प्रमोद बोंगीरवार, व्ही. एन. आय. टी. महाविघ्यालय नागपूरचे तत्कालीन प्रा. डॉ. इंगडे, तत्कालीन कार्यकारी अभियंता मनोजकुमार जयस्वाल यांनी प्रयत्न केले होते.

मच्छीमार व्यवसायाला मिळणार गती
तालुक्यात मच्छीमार बांधव मोठया संख्येने वास्तव्य करीत आहे, त्यांचा मुख्य व्यवसाय मच्छीपालन आहे. सदर पायलट बंधाÚयामुळे चिरोली परिसरात जलसाठयामध्ये भरमसाठ वाढ झाली असुन भविष्यात मच्छीमार व्यवसायाला गती मिळण्याची शक्यता आहे.

पायलट बंधारा उभारणीस यश: उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले
सिंचनाची अपुरी व्यवस्था असलेल्या चिरोली परिसरातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेले पायलट प्रकल्प पुर्ण होवुन तिन वर्षे झालेे, याप्रकल्पातील पाणी शेतकऱ्यांना दुबार-तिबार पेरणीसाठी कामात येणार आहे, केवळ 6 महिण्यात सदर पायलट प्रकल्प पुर्ण करण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आल्याची प्रतिक्रिया उपविभागीय अभियंता प्रशांत वसुले यांनी दिली.