कोंबड बाजारावर मूल पोलीसांची धाड police raid

police raid
police raid

6 जण अटकेत: चिखली परिसरातील घटना

मूल (प्रतिनिधी) : छुप्या पध्दतीने कोंबडयांची झुंज लढवुन जुगार खेळत असताना मूल पोलीसांनी धाड टाकुन 6 जणांना अटक केली आहे तर 9 दुचाकी वाहन, 2200 रूपये आणि तिन कोंबडे जप्त केलेले आहे. सदर घटना मूल तालुक्यातील मौजा चिखली-कन्हाळगाव मार्गावरील जंगल परिसरात रविवारी दुपारी 4 वाजता दरम्यान घडली. चेतन नरेंद्र गोविंदवार वय 14 वर्षे रा. मूल, विकास देविदास मोहुर्ले वय 30 वर्षे रा. सिंदेवाही, माधव मडावी वय 26 वर्षे रा. सरडपार, गणेश परशुराम नन्नावरे वय 32 वर्षे रा. लौनखेरी, मनोज दिलीप खोब्रागडे वय 32 वर्षे रा. मारोडा, बादल भाटे रा. मोरवाही यांच्यावर मूल पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. 9 two-wheelers, 2200 rupees and three cock seized

तालुक्यातील चिखली परिसरात कोंबडयांची झुंज लावुन त्यांची हार जितचा जुगार खेळल्या जात असल्याची माहिती मूल पोलीसांना प्राप्त झाली होती. मूल पोलीसांनी शोध मोहीम राबविली असता चिखली कन्हाळगाव मार्गावरील जंगलात काही इसम कोंबडयांची झुंज लावत असताना पोलीसांना दिसुन आले. पोलीस कोंबड बाजारात पोहचताच अनेक जुगारी तिथुन पडुन जाण्यास यशस्वी झाले मात्र चेतन नरेंद्र गोविंदवार वय 14 वर्षे रा.. मूल, विकास देविदास मोहुर्ले वय 30 वर्षे रा. सिंदेवाही, माधव मडावी वय 26 वर्षे रा. सरडपार, गणेश परशुराम नन्नावरे वय 32 वर्षे रा. लौनखेरी, मनोज दिलीप खोब्रागडे वय 32 वर्षे रा. मारोडा हे पोलीसांच्या हाती लागले. असुन त्यांच्यावर जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. police raid

यासोबतच 9 दुचाकी वाहने, आरोपींची अंगझडती केली असतान त्यांच्याकडुन 2200 रूपये आणि 3 कोंबडे जप्त करण्यात आले आहे. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मलिकाअर्जुन इंगडे, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार प्रशांत गायकवाड करीत आहे.