संविधान दिनानिमीत्य मुल येथे संविधान प्रस्तावना वाचन Reading the Preamble to the Constitution

Preamble to the Constitution
Preamble to the Constitution

संविधान दिनानिमीत्य मुल येथे संविधान प्रस्तावना वाचन

मूल (प्रतिनिधी): येथील चंद्रपूर मार्गावरील प्रशासकीय भवनाच्या समोरील संविधान चौकात 74 वा संविधान दिनाचे आयोजन आयोजन करण्यात आला होता, यावेळी सविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले

संविधानाचे निर्माते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून सविधान दिनाच्या कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आले, २९ ऑगस्ट १९४७ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर Dr. Babasaheb Ambedkar यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसुदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रानंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून देशभरात साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० ला भारतीय राज्यघटना देशात लागू झाली असली तरी २६ नोव्हेंबर १९४९ ला भारतीय संविधान सभेने भारताची राज्यघटना स्विकारली होती. Reading the Preamble to the Constitution

यावेळी साप्ताहिक पब्लिक पंचनामाचे संपादक विजय सिद्धावार, तालुका कॉंग्रेस कमेटीचे अध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार गुरु गुरनुले, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा दे धक्का एक्सप्रेसचे कार्यकारी संपादक मंगेश पोटवार, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, दे धक्का एक्सप्रेसचे संपादक भोजराज गोवर्धन, माजी बांधकाम सभापती मिलिंद खोब्रागडे, कार्यक्रम संयोजक सचिन वाकडे, गौरव शामकुळे, मूल लाईव्हचे संपादक अमित राऊत, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आकाश येसनकर, स्वाक्ष वाकडे, संदीप डोंगरे, राकेश मोहुर्ले, निहाल गेडाम, सुशांत वाकडे, गणेश गुरनुले, साहित्यीक लक्ष्मण खोब्रागडे, संजय मोहुर्ले, स्नेहदीप दहिवले, स्तव्य वाकडे, सुमेध मेश्राम, प्रा. गुलाब मोरे, विक्रांत मोहुर्ले, प्रा. टिकले, प्रा. तिवाडे, प्रा. बनकर, प्रा. गव्हारे, प्राचार्य पद्मराज लोखंडे, सुहानी मोहुर्ले उपस्थित होते.