तलवारबाजीत मूलची चौथाली राष्ट्रीय स्पर्धेत चमकली Thang Ta sword fight

Thang Ta sword fight
Thang Ta sword fight

थांग ता स्पर्धेत तिसरा क्रमांक

मूल (प्रतिनिधी): नुकत्याच पार पडलेल्या थांग ता तलवारबाजी या राष्ट्रीय स्तरावरील 53 किलो वजन गटातील स्पर्धेत मूल येथील चौथाली रंगनाथ पेडुकर हिने तिसरा क्रमांक पटकावुन जिल्हयाचे नांव लौकीक केलेली आहे. हरिवस भगत खेळगावं राची झारखंड येथे सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. Thang Ta sword fight

चंद्रपूर जिल्हयात खेडाळुंची खाणं आहे, दरवर्षी शेकडो विद्यार्थी राष्ट्रीय आणि राज्यस्तरावर आपआपल्या तालुक्याचे नांव भुषण करीत असतात, नुकताच पार पडलेल्या हरिवस भगत खेळगांव राची येथील थांग ता तलवार बाजी या राष्ट्रीय स्तरावरील 53 किलो वजन गटातील स्पर्धेत मूल येथील चौथाली रंगनाथ पेडुकर हिने तिसरा क्रमांक पटकाविला आहे. चौथाली पेडुकर ही मूल येथील बालविकास शाळेची विद्यार्थिनी आहे. सदर स्पर्धेत देशातील 22 राज्यांनी सहभाग घेतला. तिच्या या यशामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केल्या जात आहे. Thang Ta sword fight

चौथालीने आपल्या यशाचे श्रेय प्रशिक्षक रंगनाथ पेडूकर, भीमानंद चिकाटे, राहुल बहादे, आणि बालविकास शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता बुट्टे यांना दिलेे.