व्यापारी संकुलाला महात्मा फुले यांचे नांव द्या Business Complex

Business Complex
Business Complex

राष्ट्रवादी कॉंग्रेसची मागणी : प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्याना निवेदन सादर

मूल (प्रतिनिधी): चंद्रपूर मार्गावर नव्याने बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलाला क्रांतीसुर्य महात्मा जोबिता फुले नांव द्या अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी मूल नगर पालीकेचे प्रशासक आणि मुख्याधिकाऱ्याना दिले आहे. NCP City President Akash Yesankar

महात्मा जोतीराव फुले पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून महात्मा जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं, कालवे, बोगदे, पूल, इमारती, कापड गिरण्या, राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकाम केली. जोतीबा फुलेंच्या उद्योगपती, कार्यकारी संचालक, अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. आताच्या व्यापारी तत्वावरील सर्व व्यवहारामध्ये भ्रष्ट व्यवहार आढलून येतात. त्यानी खडकवासला धरणाच्या बांधकामात दिलेल्या योगदानातील त्यांचा स्वच्छ पणा वाखाण्यजोगाच आहे. व्यापार, उद्योग क्षेत्रात दिलेले योगदान, त्यातून मिळालेले न्याय्य आणि प्रामाणिकपणाचे धडे त्यांच्या स्मृतीला उजाळा देण्या इतकेच महत्त्वाचे. त्यांच्या कार्याचा उदो उदो करण्याची संधी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुल शहराला नामकरनाच्या माध्यमातून मिळत आहे. रंगमंचावर झालेल्या नगरपालिकेच्या व्यापरी संकुलाचे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व्यापारी संकुलन असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांच्या नेतृतवात शहराध्यक्ष आकाश येसनकर यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रोहित कामडे, महेंद्र गोगले, प्रणय रायपुरे, रजत कुकडे, निहाल गेडाम, वतन चिकाटे, रुपेश मेश्राम, तरबेज सय्यद, उबेद शेख, रोहित खोब्रागडे, साहिल बारसागडे, मंथन सिडाम, कमरान खान, शुभम बंडीवार, राहुल वाघमारे, निलेश वाळके, कृष्णा बोरेवार, प्रविण बोबाटे, शुभम निमगडे उपस्थित होते. Business Complex

सदर मागणीला कॉंग्रेसचे मूल तालुकाध्यक्ष गुरू गुरनुले, अखिल भारतीय समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हसन वाढई, कॉंगेसचे युवा नेते कैलास चलाख, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुक्तेलवार, महिला कॉंग्रेसच्या शहराध्यक्ष नलिनी आडपवार, शोभाताई बेलसरे, समताताई बनसोड, राधिका बुक्कावार, मनोज दाबणपल्लीवर यांनी पाठिंबा दिला आहे.