नितीन भटारकरसह 5 जण जिल्हा नियोजन समितीवर निवड District Planning Committee

Nitin Bhatarkar
Nitin Bhatarkar

नितीन भटारकरसह 5 जण जिल्हा नियोजन समितीवर निवड

चंद्रपूर (प्रतिनिधी) : सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या जिल्हातील 6 जणांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे, यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4 पदाधिकारी तर शिवसेनेच्या 2 पदाधिकाÚयांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणुन चंद्रपूर जिल्हयाच्या नियोजन समितीवर शासनाने नियुक्ती केली आहे. District Planning Committee

Vilas Nerkar
Vilas Nerkar

शासनाने चंद्रपूर जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणुन NCP राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार Ajit Pawar गटाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, शहर जिल्हाध्यक्ष राजिव कक्कड, चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष सुनिल काळे, वरोरा विधानसभा अध्यक्ष विलास नेरकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर शिवसेनेच्या शिंदे गटाचे बंडु हजारे आणि नितीन मत्ते यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. Nitin Bhatarkar, Rajiv Kakkad, Sunil Kale, Vilas Nerkar, Bandu Hazare, Nitin Matte

महाराष्ट्र शासनाचे उपसचिव सं. ह. धुरी यांनी 24 नोव्हेंबर रोजी काढलेल्या पत्रकानुसार सदर नियुक्ती करण्यात आलेली असुन जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियेाजन समिती चंद्रपूर यांनी सदर आदेश संबंधिताच्या निदर्शनास आणुन देण्याचे आदेशात सुचविले आहे.

जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रीत सदस्य म्हणुन नियुक्त झालेल्या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे.