वाघाच्या हल्लात युवा शेतकरी ठार Young farmer killed in tiger attack

Tiger attack
Tiger attack

मूल तालुक्यातील जानाळा येथील घटना

खुशाल कुमरे, जानाळा
शेतावर गेलेल्या एका शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना बफर क्षेत्रातील कक्ष क्रं. 523 मध्ये गुरूवारी घडली, रात्रौ होवुनही घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध केले असता आज सकाळीच्या दरम्यान त्याचा मृत्यदेह आढळुन आला. सुभाष कडपे Subhash Kadpe वय 40 वर्षे रा. जानाळा Janala असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या युवा शेतकऱ्यांचे नांव आहे. Young farmer killed in tiger attack

मूल तालुक्यातील जानाळा येथील सुभाष कडपे वय 40 वर्षे हा शेतीच्या कामानिमीत्य शेतावर गेला होता. दरम्यान दब्बा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना कक्ष क्रं. 523 मध्ये घडली. रोजच्या प्रमाणे घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध केले असता आज सकाळच्या दरम्यान त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळुन आला.

सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी मूल पोलीसांना दिली. मूल पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळ गाठुन पंचनामा केला.

वाघाचा बंदोबस्त करा: मोतीलाल टहलियानी
गेल्या काही वर्षापासुन वन्यप्राणी आणि मानवांमध्ये संघर्ष वाढत असुन यामध्ये अनेक मानवांचे जिव जात आहे. यातुन मार्ग काढण्यासाठी वाघांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रीया मूल नगर पालीकेचे माजी गटनेते मोतीलाल टहलियानी यांनी दिली.