बिबटयाच्या हल्लात युवक जखमी leopard attack

leopard attack
leopard attack

मूल तालुक्यातील मरेगांव येथिल घटना

मूल (प्रतिनिधी): शेतात बकऱ्या चारयला गेलेल्या युवकावर दबा धरून बसलेल्या बिबटयाने हल्ला करून जखमी केल्याची घटना मूल तालुक्यातील मरेगांव येथे घडली. आशिष राजु दुधकोवर वय 17 वर्षे Raju dudhkovar Maregaon असे बिबटयाच्या हल्लात जखमी झालेल्या युवकाचे नांव आहे. leopard attack

मूल तालुक्यातील मरेगांव येथील आशिष राजु दुधकोवर वय 17 वर्षे हा औद्योगिक विकास महामंडळातील पृथ्वी कंपनीच्या जवळील विश्वेश्वर कोंडु पेंदोर यांच्या शेतात बकऱ्या चारत असताना दबा धरून बसलेल्या बिबटयाने त्यांच्यावर हल्ला करून जखमी केला, आशिषने ओरडाओरड केल्याने बिबट निघुन गेला मात्र आशिष जखमी झालेला आहे. त्याला मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

घटनास्थळावर सावली वनपरिक्षेत्र कार्यायलाचे वनपरिक्षेत्राधिकारी वैभव राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक धनविजय पंचनामा करीत आहे.