जिल्हयातील कॉंग्रेसचा एक दिग्गज नेता भाजपाच्या वाटेवर On the way to BJP

MLA Ashok Chavan
MLA Ashok Chavan

चंद्रपूर (प्रतिनिधी): माजी मुख्यमंत्री आ. अशोक चव्हाण MLA Ashok Chavan यांनी नुकताच कॉंग्रेसच्या प्राथमिक सदस्यपादाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी चंद्रपूर जिल्हयातील कॉंग्रेसचा एका दिग्गज नेता लवकरचं भाजपात प्रवेश करणार असल्याचा दावा केल्याने जिल्हयात प्रचंड खळबळ उडाली आहे. Resignation of primary membership of Congress

जेलवारी न व्हावी यासाठी चव्हाण यांनी सदर पाऊल उचलले असल्याची खमंग चर्चा आहे, चव्हाण यांच्या निर्णयामुळे कॉंग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला आहे. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर MLA Santosh Bangar यांनी या राजकीय उलथापालथीवर भाष्य केलं आहे. बांगर यांनी हिंगोली येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, अशोक चव्हाण यांची शिवसेना भाजपाप्रवेशाच्या दिशेने वाटचाल चालू आहे. येत्या दोन तीन दिवसांत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्याबरोबर चंद्रपूरचे दिग्गज नेते, लातूर, नांदेड, आणी अमरावतीचे दिग्गज नेते शिवसेना आणि भाजपात प्रवेश करणार आहेत.

शिवसेना-भाजपात सातत्याने इनकमिंग चालू आहे. येत्या आठ दिवसांत राज्याच्या राजकारणात एवढा मोठा स्फोट होईल की, मला तरी वाटतंय काँग्रेस अस्तित्वातच राहणार की नाही असेही आमदार संतोष बांगर म्हणाले.