कॉंग्रेसच सिम कॉर्ड टाकुन नेटवर्क बिघडविण्याच काम करू नका : सुधीर मुनगंटीवार Don’t screw up the network : Sudhir Mungantiwar

dont-screw-up-the-network-sudhir-mungantiwar
dont-screw-up-the-network-sudhir-mungantiwar

कार्यकर्ता बैठकीत प्रतिपादन

भोजराज गोवर्धन मूल  : आपल्या मोबाईलचा सिम कॉर्ड घ्यायचा असेल तर आपल्या गावामध्ये सर्वात उत्तम नेटवर्कचा टॉवर कोणता आहे याचा विचार करतो, मोबाईलचा साध सिम असला तरी नेटवर्क चांगला राहिला पाहिजे, आवाज अतिशय स्पष्टपणे ऐकु आल पाहिजे, इंतक विचार आपण करतो, मग देशाच्या विकासाच टॉवर हे नरेंद्र मोदींच राहणार आहे, मग कॉंग्रेसच सिम कॉर्ड टाकुन आपल्या मोबाईलच नेटवर्क बिघडविण्याच काम करू नका असे आवाहन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी केले, ते मूल येथे रविवारी दुपारी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार मीत्र परीवार व व्यापारी मीत्र पक्षाच्या वतिने आयोजीत केलेल्या कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. Don’t spoil the network by installing Congress sim cord: Sudhir Mungantiwar

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, भाजपाचे शहराध्यक्ष प्रभाकर भोयर, मूल नगर पालीकेचे माजी अध्यक्ष विजय चिमडयालवार, रत्नमाला भोयर, उषाताई शेंडे, माजी गटनेते मोतीलाल टहलियानी, माजी उपाध्यक्ष नंदकिशोर रणदिवे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार उपस्थित होते. Sandhyatai Gurnule, Prabhakar Bhoyer, Vijay Chimdayalwar, Ratnamala Bhoyer, Ushatai Shende,  Motilal Tahliani, Nandkishore Randive, Mangesh Potwar

आमदार मुनगंटीवार पुढे म्हणाले की, कॉंग्रेस विकासावर मतदार मागत नाही, कारण त्यांना सांगण्यासारखं काही नाही, कॉंग्रेस मतदान जातीवर मागते, हे विष जाती जातीमध्ये पोहचु देवु नका, उद्या जातीच्या नावावर निवडणुका झाल्या तर इतर जातीने कुणाकडे बघायचं, सार्वजनिक जिवनात आपण कधीही जात बघत नाही, एखादा रूग्ण डॉक्टरकडे जातो, तेव्हा तो माझेच जातीचा असेल तर औषध घेता असा भाव नसतो, एखादा विद्यार्थी माझेच जातीचा शिक्षक असेल तरच मि शिकेन अस कधीही म्हणत नाही, यामुळे सर्व जाती, धर्माच्या प्रतिनिधीना वचन देतो, कोणत्याही जाती धर्माचे खासदार निवडुन येईल त्यापेक्षा 10 पट जास्त काम करेन असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. Do not sow caste poison

जिल्हात माफीयाराज, गुंडाराज येवु नये अस वाटत असेल तर आताच सावधान व्हा, गाडी एकदा सुटली तर परत येत नाही, एकदा चुक झाली तर पाच वर्षे पश्चाताप करण्यापलीकडे आपल्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही, कार्यकर्त्यांनी 4 वर्षे 11 महिने मेहनत घेतली असेल परंतु या 5 दिवसात कमी पडले तर विकासाचं पराभव होईल, आणि माफीयाराज गुंडागर्दीचा विजय होईल, हे होवु दयायच नसेल तर कार्यकर्त्यांनी नावासाठी, फोटोसाठी आणि सन्मानासाठी देशावर अन्याय होईल, देशाची अधोगती होईल अस कोणतंही कृत्य करू नये, ज्यांना वाटेल माझं निवडणुकीत सन्मान झाला नाही त्यांचा निवडणुकीनंतर व्याजासहित सन्मान करू असे प्रतिपादन सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले. Mafiyaraj, Gundaraj should not come in the district

यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले, माजी नगराध्यक्ष रत्नमाला भोयर, माजी गटनेते मोती टहलियानी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष मंगेश पोटवार यांनी आपले विचार व्यक्त केले.

सभेचे संचालन निलेश रॉय यांनी केले. यावेळी भाजपा, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.