‘अब की बार सुधीरभाऊ खासदार’- आ. किशोर जोरगेवारांनी केली दमदार घोषणा Announcement of MLA Kishor Jorgewar

Announcement of MLA Kishor Jorgewar
Announcement of MLA Kishor Jorgewar

चंद्रपूरच्‍या विकासासाठी ना. मुनगंटीवार यांनी घेतली गॅरंटी

यंग चांदा ब्रिगेडचा मेळावा संपन्‍न

चंद्रपूर (प्रतिनिधी) : आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वातील यंग चांदा ब्रिगेड समर्थन व पाठिंबा देत माझ्यासोबत आली आहे. हा विचारांचा संगम आहे. याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघातील भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई (आठवले गट), पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. Announcement of MLA Kishor Jorgewar

Announcement of MLA Kishor Jorgewar1
Announcement of MLA Kishor Jorgewar1

यंग चांदा ब्रिगेड तर्फे शकुंतला लॉन, नागपूर रोड, चंद्रपूर येथे मेळाव्‍याचे आयोजन करण्‍यात आले होते. त्‍यावेळी ते बोलत होते. मंचावर चंद्रपूरचे आमदार क‍िशोर जोरगेवार, त्‍यांच्‍या पत्‍नी कल्‍याणी जोरगेवार, शिवसेनेचे चंद्रपूर जिल्‍हा संपर्कप्रमुख क‍िशोर राय, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष हरीश शर्मा, राष्‍ट्रवादीचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन भटारकर, शिवसेनेचे जिल्‍हाध्‍यक्ष नितीन मते व बंडू हजारे, प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, प्रतिमा ठाकूर, भरत गुप्‍ता, यंग चांदा ब्रिगेडच्‍या महिला प्रमुख वंदना हातगावकर, सविता दंडारे, सायली येरणे, सरोज चांदेकर, अजय जयस्‍वाल यांच्‍यासह भाजपा महायुती तसेच, यंग चांदा ब्रिगेडचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्‍थ‍िती होते.  sudhir Mungantiwar

रामनवमी निमित्‍त सर्वांना ना. सुधीर मुनगंटीवार यांनी शुभेच्‍छा दिल्‍या. ते पुढे म्हणाले, देशामध्‍ये सध्‍या विश्‍वगौरव मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा ‘टॉवर’ कार्यरत असून त्‍यात चुकून कॉंग्रेसचे सीम टाकल्‍यास नेटवर्क म‍िळणार नाही. विक सिग्‍नलमुळे संवाद होणार नाही. त्‍यामुळे योग्‍य मोबाईल मध्‍ये योग्‍य ते सीम टाका, असा सल्‍ला त्‍यांनी दिला.

ही निवडणूक देशाच्या प्रगतीची
कुणबी समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असून यंदा ‘ना जात पर, ना पात पर राजनिती होगी विकास पर’, हे लक्षात ठेवा. प्रतिस्‍पर्धी उमेदवार विकासावर चर्चा करत नसून सोशल मिडीयावर निच प्रचार करत आहे. जे लोक चुकीचे काम करत आहेत, त्‍यांचा निश्चितपणे पराभव होईल.देशात मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांनी सामाजिक, सांस्‍कृतिक, आर्थिक, धार्मिक, आध्‍यात्मिक क्षेत्रात प्रगती मोदींजीनी केली आहे. लोकसभेची ही लढाई कोणा एका व्‍यक्‍तीची, त्‍याच्‍या मोठेपणाची नसून ही देशाच्‍या, तिरंग्याच्‍या सन्‍मानाची आहे असे ना. मुनगंटीवार म्हणाले.

ना. मुनगंटीवार विकासाचे ‘ब्‍लूप्रिंट’ – आ. क‍िशार जोरगेवार
ना. मुनगंटीवार हे माझे गुरू आहेत, असा उल्‍लेख करून आ. क‍िशोर जोरगेवार म्‍हणाले, सध्‍या संपूर्ण देशाचे लक्ष मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्‍याकडे तर महाराष्‍ट्राचे लक्ष ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍याकडे लागले आहे. ना. मुनगंटीवार हे एक लाखापेक्षा अधिक मतांनी निवडून येत लोकसभेत जातील, असा मला विश्‍वास आहे. चंद्रपूरमध्‍ये विकासाची खूप ताकद असून ही ताकद जगाला दाखवण्‍याची ही उत्‍तम संधी आहे. ना. मुनगंटीवार हे केवळ चंद्रपूरचे नाही तर राज्‍याच्‍या विकासाचे ‘ब्‍लूप्रिंट’ आहेत, असे आ. जोरगेवार म्‍हणाले.

ना. मुनगंटीवार यांच्याकडे अफाट शक्ती, नियोजन, सखोल अभ्यास
चंद्रपूर जिल्‍हा हा शासन दरबारी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या नावाने ओळखला जातो. त्‍यांनी या जिल्‍हयाचा समग्र विकास केला. शासनाच्‍या योजना प्रभावीपणे राबवल्‍या. अफाट शक्‍ती, नियोजनबद्ध व प्रत्‍येक विषयावर सखोल अभ्‍यास करून आकडेवारीसह विश्‍लेषण करणारे ना. मुनगंटीवार यांची विकासाची दृष्‍टी विस्‍तीर्ण असून त्‍यांना लोकसभेत पाठवल्‍यास केंद्राच्‍या विकासाच्‍या योजनादेखील ते चंद्रपूरपर्यंत आणतील, याची मी ‘गॅरंटी’ देतो, असे म्‍हणत यंग चांदा ब्रिगेडचे सरसेनापती व चंद्रपूरचे आ. क‍िशोर जोरगेवार यांनी ‘अब की बार सुधीरभाऊ खासदार’ अशी दमदार घोषणा केली.