मतदान साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना
चंद्रपूर (प्रतिनिधी): चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 19 एप्रिल 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत होणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लक्ष 37 हजार 906 मतदार आहे. यात 9 लक्ष 45 हजार 736 पुरुष मतदार, 8 लक्ष 92 हजार 122 स्त्री मतदार तर 48 इतर मतदार आहेत. 18 lakh 37 thousand 906 voters in Chandrapur Lok Sabha constituency
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 70 – राजुरा, 71 – चंद्रपूर, 72 – बल्लारपूर, 75 – वरोरा, 76 – वणी आणि 80 – आर्णि या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. राजूरा मतदारसंघात 330 मतदान केंद्र, चंद्रपूर मतदारसंघात 383 मतदान केंद्र, बल्लारपूर मतदारसंघात 361 मतदान केंद्र, वरोरा मतदारसंघात 340 मतदान केंद्र, वणी मतदारसंघात 338 मतदान केंद्र तर आर्णि मतदारसंघात 366 मतदान केंद्र असे एकूण 2118 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर मतदानाचे संपूर्ण साहित्य घेऊन पोलिंग पार्टी रवाना झाल्या आहेत. Chandrapur Lok Sabha constituency
टोकन सुविधा : उन्हाचा तडाखा लक्षात घेता मतदान केंद्रावर मतदारांकरीता निवारा / प्रतिक्षालय तयार करण्यात आले आहे. तसेच मतदान केंद्रावर गर्दीची परिस्थिती उद्भवून मतदारांना अडचण होणार नाही, याकरीता टोकन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तिंसाठी उपाययोजना : जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदाराकरीता त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर जिल्हा प्रशासनाकडून मतदारांच्या मदतीकरीता मदतनीस / स्वयंसेवकाची नियुक्ती करण्यात आली आहे.