ट्रकच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यु youth died in a collision with a truck

Prajot Gedam
Prajot Gedam

मूल येथील गांधी चौकातील घटना

संगिता गेडाम, मूल
उन्हाळयाचे दिवस असल्याने टेकाडी Tekadi येथुन मूल येथे आईस्क्रीम खाण्यासाठी आलेल्या युवकांवर सिंदेवाही Sindewahi वरून चंद्रपूरकडे Chandrapur जाणाÚया वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे एका युवकाला धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना मूल येथील गांधी चौकात रविवारी रात्रौ 10 वाजताच्या दरम्यान घडली. प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे Prajot Gedam रा. चोरगाव असे मृत्तक युवकाचे नांव आहे. youth died in a collision with a truck

मूल तालुक्यातील आकापूर येथील देवनिल Devnil नर्सींग विद्यालयात नर्सींगचे कोर्स करीत असलेल्या प्रज्योत नरेंद्र गेडाम वय 20 वर्षे रा. चोरगांव त. चंद्रपूर हा विद्यार्थी आपल्या काकाकडे टेकाडी येथे राहात होता, रविवारी जेवन केल्यानंतर आईस्क्रिम खायची इच्छा झाल्याने तो अनिकेत गोंगले वय 19 वर्षे आणि मुस्ताक अल्ली सय्यद वय 21 वर्षे रा. टेकाडी यामित्रांसोबत मूल येथे आला, Aniket Gongle Mustaq Alli Sayyad

दरम्यान गांधी चौक येथील आईस्क्रीमच्या दुकानातुन तो आईस्क्रिम घेवुन खात असतानाच सिंदेवाही वरून चंद्रपूर कडे जाणारा ट्रक क्रं. एम एच 40 बि जी 8268 चे चालक मनोजकुमार व्दारकासींग तिवारी वय 55 वर्षे रा. नागपूर याचे वाहनावरून नियंत्रण सुटल्याने तो प्रज्योत नरेंद्र गेडाम यांना जबर धडक दिली. यात तो जागीच ठार झाला, इतर जवळपास असलेल्या नागरीकांनी इतरत्र पळापळ केली, जवळच असलेल्या एका ऑटोलाही ट्रकनी धडक दिली, मात्र ऑटोचे नुकसान झालेले नाही. मृत्तकाचे मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करून शव नातेवाहीकांच्या सुपुर्द करण्यात आले. Manoj Kumar Vdarkasingh Tiwari

आरोपीवर मूल पोलीस स्टेशन येथे कलम 279, 337, 304 (अ) भादवी, मुंबई पोलीस अॅक्ट कलम 184 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ठाकरे, पोलीस अमलदार यशवंत कोसनशिल्ले, रफीक शेख करीत आहे.