डॉ. दिनेश वाळके विदर्भ उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित Vidarbha Udyog Ratna Award

Vidarbha Udyog Ratna Award
Vidarbha Udyog Ratna Award

नागपूरात पार पडला पुरस्कार वितरण सोहळा

मूल (प्रतिनिधी): शेतकऱ्यांना मोत्याची शेती करण्यासाठी मार्गदर्शन करून शेतकऱ्यांचे आर्थीकस्तर उंचावणाऱ्या  ग्रीनराज अँकवा अँग्री प्रायव्हेट लिमीटेडचे व्यवस्थापीक संचालक डॉ. दिनेश वाळके Greenraj Anqua Angry Private Limited यांना विदर्भ उद्योगरत्न पुरस्कार जाहिर करण्यात आला होता. नागपूर येथील रेजेंठा सेलिब्रेशन सभागृहात मराठी अभिनेत्री पुजा सावंत यांच्या हस्ते डॉ. दिनेश वाळके यांना नुकतेच सन्मानित करण्यात आले. Dr. Dinesh Walke

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मोत्याच्या शेतीचे काम मोठया प्रमाणावर सुरू आहे. मोत्याच्या शेतीचे उत्पन्न घेवुन अनेक शेतकरी आर्थिक सक्षम होत आहे. 14 ते 16 महिन्याचा कालावधीत मोत्याच्या शेती मधुन उत्पादन घेत असुन शेतीसाठी लागलेल्या भांडवलापेक्षा दुप्पट उत्पादन शेतकरी घेत आहेत. सदर शेतीची लागवड, देखरेख व विक्री ही ग्रीनराज कंपनीच्या माध्यमातून होत असते. दरम्यान स्विफ्ट एन लिफ्ट या उद्योग कंपनीने महाराष्ट्रात सर्व्हे करून कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. दिनेश वाळके यांची विदर्भ उद्योगरत्न पुरस्कारसाठी विदर्भातून निवड करून नुकताच नागपूर येथील रेजेंठा सेलिब्रेशन सभागृहात मराठी प्रसिद्ध अभिनेत्री पुजा सावंत यांचे हस्ते प्रशस्तीपत्र, शिल्ड देवून ग्रीनराज चे डॉ. दिनेश वाळके आणि अभिजित बंछोर याना सन्मानित करण्यात आले. Marathi actress Pooja Sawant

कार्यक्रमाला स्विफ्ट एन लिफ्टचे कार्यकारी संचालक निलेश साबे आणि विदर्भातील वेगवेगळया क्षेत्रातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Swift n Lift