स्थानिक गुन्हे शाखेची मूल पोलीस स्टेशन ह्रदयीत कारवाई Action by LCB

Action by local crime branch
Action by local crime branch

सुशी-चिरोली मार्गावर 8 लाख 75 हजाराची दारू जप्त

मूल (प्रतिनिधी):- गडचिरोली जिल्हयातील एटापल्लीकडे महेंद्र पिकअप वाहनाने देशी दारूची वाहतुक करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुल पोलीस स्टेशन ह्रदयीत येत असलेल्या सुशी-चिरोली मार्गावर नुकतीच कारवाई केली आहे. सदर कारवाईमुळे अवैध दारूविक्रेत्याचे धाबे दणाणले आहे. मनोज जगदिश मुजुमदार वय 39 वर्षे रा. एटापल्ली आणि करणसिंग ओमसिंग पटवा वय 29 वर्षे रा. मूल यांना अटक करण्यात आले आहे. Manoj Mujumdar Etapalli, Karan Singh Patwa Mul arrested

मूल वरून चिरोली-सुर्शी मार्गे अवैध दारू नेत असल्याची गुप्त माहिती चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. माहितीच्या आधारे सहा. पालीस निरीक्षक हर्षल एकरे, मनोज गदादे, पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले यांच्या नेतृत्वातील पथकाने सुशी-चिरोली मार्गावर रात्रौ 12 वाजता दरम्यान नाकेबंदी करून वाहणांची तपासणी करीत असताना महेंद्र पिकअप वाहन क्रं. एम एच 33 टी 2024 मध्ये 100 पेटया देशी दारू आढळुन आली.  Action on Sushi-Chiroli route

पोलीस पथकाने लागलीच पंचासमक्ष चौकशी करून वाहणासह वाहण चालक मनोज जगदिश मुजुमदार (39) रा. एटापल्ली आणि सहकारी करणसिंग ओमसिंग पटवा (29) रा. मूल यांना ताब्यात घेतले. पकडण्यात आलेल्या दारुची किंम्मत 8 लाख 75 हजार असुन वाहणाची किंम्मत 7 लाख असा एकुण 15 लाख 75 हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या वाहणातील देशी दारु चिरोली येथील अमोल रामदास ढोरे यांच्या देशी दारु दुकानातील असल्याचे सांगण्यात आले. Action by local crime branch

जिल्हा पोलीस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांनी अवैद्य दारु विक्रेत्यांच्या मुसक्या आवळणे सुरु केले असुन पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वाखाली अनेक पथके तयार करण्यात आली आहे.

मूल पोलीस स्टेशनच्या हद्दीमधुन लाखोची दारु वाहतुक होत असतांना मूल पोलीसांना माहीती न होता चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेला माहीती होवुन पकडण्यात यावी. याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यापुर्वी पंधरा दिवसा आधी चंद्रपूर येथील स्थानिय गुन्हे शाखेच्या पथकाने मूल तालुक्यातील भवराळा लगत 8 लाखाचा माल हस्तगत केला होता. हे विशेष.