वाघाची शिकार करणारा एक आरोपी न्यायालयीन कोठडी Tiger hunting

Tiger hunting
Tiger hunting

15 दिवसाची न्यायालयीन कोठडी : सहआरोपीस जामीन मंजुर

मूल (प्रतिनिधी): वन्यप्राण्याच्या त्रासाला कंटाळुन मूल तालुक्यातील उथळपेठ येथील शेतकऱ्यानी चक नलेश्वर येथील शेतातील उभे असलेल्या मक्का पिकांच्या रक्षणासाठी शेतात विद्युत प्रवाह सोडल्याने सदर विद्युत प्रवाहाला वाघाचा स्पर्श होवुन मृत्यु झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असुन आरोपीला 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. Uthlpeth  सुरेश विट्ठल चिचघरे असे आरोपी शेतकऱ्याचे नांव आहे. Suresh Chichghare

suresh Chichghare
suresh Chichghare

मूल तालुक्यातील मौजा उथळपेठ येथील सुरेश विट्ठल चिचघरे यांची शेती चक नलेश्वर येथे सर्व्हे क्रं. 55/2 आहे. सदर शेतात शेतकऱ्यानी धान पिकाचे उत्पन्न घेत होते. धानपिकाचे उत्पन्न निघाल्यानंतर चिचघरे यांनी मक्का पिकाचे उत्पन्न घेत होते आणि शेताच्या मधल्या भागात तुरी लावलेले होते. दरम्यान वन्यप्राणी शेतात येवुन मक्का आणि तुरीचे नुकसान करीत असल्यानेे, पिकाच्या रक्षणासाठी सुरेश चिचघरे यांनी शेतालगतच्या 11 केव्ही मधुन माहे डिसेंबर महिण्यात विद्युत प्रवाह सोडले होते. सदर विद्युत प्रवाहाला वाघाचा स्पर्श झाल्याने तो जागीच ठार झाला, कुणाला माहित होण्याआधीच चिचघरे यांनी मृत वाघाचा बंदोबस्त करण्याची तयारी केली, जवळपास 3 दिवस वाघाचे लहान तुकडे करून चक नलेश्वर सर्व्हे नं. 55/2 या शेतात जाळुन त्याला जमिनीत खोल खड्डा करून पुरविले. दरम्यान सदर घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे सहाय्यक धनसंरक्षक (तेंदु) जी. आर. नायगमकर, राष्ट्रीय व्याध प्राधीकरण प्रतिनीधी बंडू धोतरे, व प्रधाम मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनीधी मुकेश भांदककर यांनी भेट दिली. व तपास केले असता वन्यप्राण्याचे 1 नग सुळे दात व जळालेले अवयव आढळून आले. वाघाचा विद्युत प्रवाहाला स्पर्श होवुन मृत्यु झाल्याचे तपासात सिध्द झाल्याने व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याने वनविभागाने वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करून अटक केले. प्रथम श्रेणी न्यायायल मूल येथे हजर केले असता 15 दिवसाची न्यायालयीन कोठडी मंजुर करण्यात आली. सदर आरोपीला सहकार्य करणारे सहआरोपी श्रीकांत मुर्लीधर बुरांडे   रा. उथळपेठ Shrikant Burande यांना 8 मे रोजी अटक करून न्यायालय हजर केले. परंतु त्याला जामीन मंजुर झाली. गुन्हात वापरलेली टॅªक्टर, नागरटी व मोटार सायकल वनविभागाने जप्त केले आहे. Chandrapur Forest Department

सदरची कार्यवाही चंद्रपुर वनविभागाचे विभागीय वन अधीकारी शुभांगी चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक (तेंदु) जी. आर. नायगमकर यांचे मार्गदर्शनाखाली चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्र अधीकारी प्रियंका आर. बेलमे, संजीवनी पर्यावरण संस्था मूलचे अध्यक्ष उमेशसिंग झीरे, मूलचे क्षेत्र सहा. एम. जे. मस्के, महादवाडीचे क्षेत्र सहा. प्रशांत खनके, चिरोलीचे वनरक्षक एस. मी. गोडाम, जानाळाचे वनरक्षक राकेश गुरनुले, मूलचे वनरक्षक सुधीर ठाकुर, वन्यजिव रक्षक तन्मयसिंग झीरे व वनकर्मचारी यांनी केली.