जुळया बहिणींनी दहावीच्या परिक्षेत मिळवीले यश Twin sisters succeed

Twin sisters succeed
Twin sisters succeed

नवभारत कन्या विद्यालयातील विद्यार्थींनीचे सुयश

मूल (प्रतिनिधी) : येथील नवभारत कन्या विद्यालयातील विद्यार्थींनी अक्षरा व आकांशा संजय बावणे या जुळया बहिणींनी दहावीच्या परिक्षेत यश संपादन केले असुन अक्षरा बावणे हिने 90.20 टक्के Akshara Bawne तर आकांशा बावणे हिने 89.60 टक्के Akansha Bawne गुण पटकाविले आहे. या दोन्ही जुळया बहिणींनी दहावीच्या बोर्डाच्या परिक्षेत अनोखे यश प्राप्त केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. Twin sisters succeed in class 10th exam

मूल तालुक्यातील नलेश्वर येथील संजय बावणे यांना जुळया मुली झाल्या, अक्षरा आणि आकांशा असे त्या मुलींचे नांव, मोठी मुलगी अक्षरा तर पाच मिनीटानी लहान असलेली आकांशा यांचे प्राथमिक शिक्षण नलेश्वर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले, अभ्यासात अतिशय हुशार असलेल्या मुलींना तालुक्यात जावुन शिक्षण घेण्याची इच्छा वडीलांसमोर व्यक्त केल्याने, संजय बावणे यांनी सन 2022-23 या शैक्षणिक सत्रात मूल येथे किरायाचे घर घेवुन नवभारत कन्या विद्यालयात त्यांना प्रवेश घेवुन दिला. वडील संजय बावणे हे मूल विहीरगांव येथील तलाठी कार्यालयात कोतवाल म्हणुन कार्यरत आहेत. कठीण परिस्थित जिवण जगत असतानाही संजय बावणे यांनी मुलींच्या शिक्षणासाठी कुठलीही अडचण भासु न देता शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहीत केले. Students of Navbharat Kanya Vidyalaya

अतिशय कुशाग्र बुध्दीच्या या दोन्ही जुळया बहिणी शालेय जिवनापासुनच अभ्यासामध्ये प्रगतीपथावर आहेत. विशेष बाब म्हणजे, त्यांना आता विज्ञान शाखेत प्रवेश घेवुन पुढील शिक्षण घ्यायचे आहेत. आणि शासकीय सेवेत रूजु होवुन जनतेची सेवा करण्याची इच्छा अक्षरा आणि आकांशा यांची आहे