डिमांड भरूनही तिन वर्षापासुन शेतकरी विज पुरवठयापासुन वंचित Farmers deprived of electricity supply

Farmers deprived of electricity supply
Farmers deprived of electricity supply

विज वितरण कंपनीमुळे दरवर्षी हजारो रूपयांचे नुकसान

मूल (प्रतिनिधी) : पाण्याअभावी दरवर्षी शेतातील पिकाचे नुकसान होत असल्याने, शेतकऱ्याने शेतात विज पुरवठा घेवुन भरघोष उत्पन्न घेण्यासाठी सावली विज वितरण कंपनीकडे डिमांड भरले मात्र तिन वर्षे लोटुनही अद्याप विज पुरवठा न दिल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने विज वितरण कंपनीपुढे ठिय्या आंदोलन करण्याची भुमिका घेतली आहे. गुरूदास दादाजी गुरनुले असे विज कनेक्शन मिळविण्यासाठी हताश झालेल्या शेतकऱ्याचे नांव आहे. Farmers deprived of electricity supply

Farmers deprived of electricity supply1
Farmers deprived of electricity supply1

मूल येथील शेतकरी गुरूदास दादाजी गुरनुले यांना Saoli सावली तालुक्यातील मौजा खेडी येथील Khedi  भुमापन क्रं. 247/2 ही चार एकर शेती आहे. शेतात नवनविन प्रकारचे धान आणि पराटी लागवड करीत आहेत. परंतु गेल्या काही वर्षापासुन त्यांनी लागवड केलेल्या पिकांना पाण्याअभावी पाहीजे त्याप्रमाणात उत्पन्न घेता येत नसल्याने 3 मे 2021 रोजी सावली येथील विज वितरण कंपनीकडे त्यांनी अर्ज केले, विज वितरण कंपनीने चौकशी करून 10 हजार 185 रूपयांचा डिमांड दिला, गुरनुले यांनी विज पुरवठा तात्काळ मिळेल याअपेक्षेने त्यांनी तात्काळ डिमांडची रक्कम पत संस्थेमार्फत भरले आणि विज वितरण कंपनीकडे त्यांनी नेवुन दिले आज 3 वर्षे लोटुन चौथा वर्षे सुरू झालेला आहे मात्र अजुनही त्यांच्या शेतात विज पुरवठा दिलेला नसल्याने पिकाचे हजारो रूपयाचे नुकसान दरवर्षी होत आहे. Farmer Gurudas Dadaji Gurnule

परिसरातील अनेक शेतकऱ्यानी विज पुरवठासाठी अर्ज केलेले आहेत मात्र विज वितरण कपंनीकडुन विज पुरवठा केला जात नसल्याने विज वितरण कपंनी प्रती तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शासनाने शेतकऱ्याच्या शेतात विज जोडणी करून देण्याची मागणी शेतकरी गुरूदास गुरनुले यांच्यासह शेतकÚयांनी केली आहे अन्यथा तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. Saoli Vij Distribution Company