मूल तालुक्यातील डोंगरगांव येथील घटना
संगिता गेडाम मूल: सततधार पावसाने शेतातील रोवणे वाहुन गेल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने सार्वजनिक विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना मूल तालुक्यातील डोंगरगांव येथे मंगळवारी सायंकाळी 7 वाजता दरम्यान घडली. विश्वनाथ वारलुजी मडावी वय 60 वर्षे रा. डोंगरगाव असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नांव आहे. Vishwanath Warluji Madavi
मूल तालुक्यातील मौजा डोंगरगांव येथील शेतकरी विश्वनाथ वारलु मडावी वय 60 वर्षे यांची डोंगरगांव शेतशिवारात शेती आहे. शेतातील पिक घेण्यासाठी त्यांनी सेवा सहकारी सोसायटी व बचत गटांकडुन कर्ज घेतले होते. कर्जाच्या रक्कमेतुन त्यांनी दोनदा रोवणी केली, मात्र सततधार पावसामुळे त्यांचे रोवणे वाहुन गेली, यामुळे निराश झालेल्या विश्वनाथ मडावी या शेतकऱ्याने कर्ज फेडायचे कसे याविवंचनेत असताना मंगळवारी सायंकाळी 7 वाजता दरम्यान सार्वजनिक विहीरीमध्ये उडी घेवुन आत्महत्या केले. Dongrgaon Mul
सदर घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशन येथे देण्यात आली, मूल पोलीस स्टेशनचे पथक डोंगरगांव येथे येवुन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले. पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.