शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन Free health check-up camp

Free health check-up camp
Free health check-up camp

मोफत मधुमेह, हाडांची तपासणी ई.सी.जी. व औषध वितरण

मूल (प्रतिनिधी) : श्युअरटेक हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटर लिमीटेड आणि जनरल मेडीकल प्रक्टीशनर असोशिएशन मूलच्या वतिने जागतिक आरोग्य दिनानिमीत्य मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन शनिवार (5 एप्रिल) रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. Free health check-up camp

मूल येथील रामलीला भवन येथे आयोजीत केलेल्या आरोग्य शिबीरामध्ये हदयरोग तज्ञ, हाडांचे तज्ञ आणि स्त्रिरोग तज्ञांकडुन तपासणी करण्यात येणार आहे, त्यासोबतच जनरल आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी श्युअरटेक हॉस्पीटल अॅण्ड रिसर्च सेंटर लि. कार्डीओलॉजी, पॉलीट्रामा, सुपर स्पेशालिस्ट युनिट जामठा येथील तज्ञ वैद्यकीय अधिकारी उपस्थित राहुन रूग्णांची तपासणी करणार आहेत. Suretech Hospital & Research Centre Limited and General Medical Practitioners Association

रूग्णांनी शिबीरामध्ये येतांना तपासणीचे सर्व जुने कागदपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. सदर आरोग्य शिबीराला मोठया संख्येने रूग्णांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जनरल मेडीकल प्रक्टीशनर असोशिएशनने केले आहे. Ramlila Bhavan