शोभाताईंबद्दल समाजासमाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न Shobha Fadanvis

Shobha Fadanvis
Shobha Fadanvis

स्थानिक भाजपा नेत्यांच्या भेटीनंतर शोभाताईंचे स्पष्टीकरण

मूल (प्रतिनिधी) : मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार किरण कापगते यांना भाजपाकडुन मिळालेल्या उमेदवारीचे खापर येथील भाजपाच्या काही नेत्यांनी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्यावर फोडत आहेत. शोभाताईंनी किरण कापगते यांना उमेदवार मिळवुन दिली अशी चर्चा होत आहे, याबद्दल स्थानिक पत्रकारांनी शोभाताईंना बोलते केले असता त्यांनी आजारी असल्यामुळे मी कोणाला भेटत नाही, आणि किरण कापगते हिला कोणाच्या माध्यमातुन उमेदवार मिळाली याबद्दल मला माहीती नसल्याचे स्पष्ट केल्या. Shobha Fadanvis

मूल येथील स्थानिक भाजपा नेत्यांनी भाजपाच्या जेष्ठ नेत्या, माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्या दारी जावुन आपल्याच प्रयत्नामुळे प्रा. किरण कापगते यांना उमेदवारी मिळाली, यामुळे आपण आशिर्वाद देवुन प्रचारकार्यासाठी मदत करण्याची विनंती केली, यावेळी शोभाताईंनी मी भाजपाची आहे, मी भाजपासाठी मदत करेन, मी कोणत्या एकासाठी नाही, परंतु उमेदवारी कोणामुळे मिळाली याबद्दल मला माहिती नाही, आजारी असल्यामुळे मी सध्यातरी कोणालाही भेट नाही, यामुळे मी कोणासाठीही प्रयत्न केलेली नाही असे शोभताईंनी सांगीतल्याचे म्हटले आहे. BJP

नगरगांव येथील सदानंद बोरकर 3 महिण्यापुर्वी  माझेकडे आले होते, त्यांनी नवरगांव येथील एका शैक्षणिक संस्थेच्या अमृत महोत्सवाच्या उदघाटन कार्यकमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेवुन देण्याची विनंती केली, दरम्यान मी मुख्यमंत्र्यांना फोन करून त्यांच्याशी बोलणे करून दिले, त्यांनतर त्यांची-माझी कधीही भेट झालेली नाही असेही त्या म्हणाल्या. Kiran kapgate

इंजि. शिवाणी आगडे यांना भाजपाकडून मूल नगर पालीकेच्या नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहिर झाल्याची चर्चा सुरू असतांनाच दोन दिवसांनी प्रा. किरण कापगते यांना उमेदवारी जाहिर झाली, प्रा. किरण कापगते यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर 18 नोव्हेंबर रोजी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रा. किरण कापगते यांच्यासह मूल येथील भाजपा नेते शोभाताई फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वाडयात गेले, दरम्यान यासर्व घडामोडी वरून माझेबद्दल समाजासमाजात गैरसमज निर्माण करीत असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगीतल्या. Shivani Aagde